बॅंकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन मुलगी झाली करोडपती, वर्षभरात उडवले 18 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 01:19 PM2022-09-13T13:19:10+5:302022-09-13T13:20:11+5:30

बॅंकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन मुलगी झाली करोडपती झाली आहे.

College student Christine Jiaxin became a millionaire thanks to a mistake by Westpac Bank | बॅंकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन मुलगी झाली करोडपती, वर्षभरात उडवले 18 कोटी

बॅंकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन मुलगी झाली करोडपती, वर्षभरात उडवले 18 कोटी

Next

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. कधी एका रात्रीत दिवाळखोरीला आलेली माणसे समोर येतात तर काहींचे नशीब अचानक चमकते आणि धन-संपत्तीने मालामाल होतात. सध्या अशाच एका तरूणीची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. या तरूणीला बॅंकेच्या एका चुकीमुळे तब्बल 18 कोटींची जणू काय लॉटरीच लागली. कारण बॅंकेने केलेल्या एका चुकीमुळे ही महाविद्यालयीन तरूणी रातोरात मालामाल झाली.

दरम्यान, क्रिस्टीन जियाक्सिन (Christine Jiaxin) नावाची विद्यार्थिनी वेस्टपॅक ( Westpac) बँकेच्या चुकीमुळे वर्षभर राजेशाही जीवन जगली. तिने 11 महिन्यांत केवळ महागड्या बॅग, कपडे आणि अपार्टमेंटवर करोडो रुपये खर्च केले. महाविद्यालयीन तरूणीचा हा प्रताप सर्वांचे लक्ष वेधत आहे, कारण काही दिवसांतच या तरूणीचे आयुष्य बदलून गेले होते.

खात्यात आले तब्बल 24 कोटी रूपये
क्रिस्टीन जियाक्सिन ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असून ती सिडनीमध्ये शिक्षण घेत आहे. वेस्टपॅक बँकेने 2 वर्षांपूर्वी केलेल्या एका चुकीमुळे तिच्या खात्यात £2.6 मिलियन म्हणजेच 24 कोटी रूपयांहून अधिक रक्कम जमा झाली. जेव्हा 21 वर्षीय क्रिस्टीन जियाक्सिनने ही रक्कम पाहिली तेव्हापासून तिने तिच्या राहणीमानात बदल करण्यास सुरूवात केली. लक्षणीय बाब म्हणजे 11 महिन्यांत या  मुलीने भरपूर पैसे खर्च केले. दागिने आणि कपड्यांपासून ते परिसरातील एका महागड्या पेंटहाऊसमध्ये घर बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींवर तिने ही रक्कम उडवली. 

पैसे घेऊन तरूणी झाली होती फरार
आपल्या खात्यात कोट्यवधी रूपयांची रक्कम असल्यामुळे तरूणीने राजेशाही जीवन जगण्यास सुरूवात केली. तिने जवळपास £2,500 म्हणजेच 2.3 लाख रूपये सीक्रेट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. मलेशियामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या प्रियकराने आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा केला आहे, प्रकरण उघडकीस येताच क्रिस्टीन फरार झाली होती. बॅंकेतील अधिकाऱ्यांनी सर्व बाबींच्या माध्यमातून सुमारे 10 कोटी रुपये जमा केले, मात्र उर्वरित रक्कम त्यांना अद्याप मिळाली नाही. मात्र अटकेनंतर क्रिस्टीनने सांगितले की, तिला वाटले की तिच्या पालकांनी तिच्या खात्यात इतके पैसे ट्रान्सफर केले आहेत.



 

Web Title: College student Christine Jiaxin became a millionaire thanks to a mistake by Westpac Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.