वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:06 AM2024-05-24T08:06:38+5:302024-05-24T08:07:21+5:30

टेम्पो ट्रॅव्हलरची अवस्था पाहून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो. ही टेम्पो ट्रॅव्हलर निम्मी चेपली गेली आहे.

Ambala Tempo Traveler Accident: A family going to Vaishnodevi's darshan; Seven dead, 19 injured, including a six-month-old baby girl | वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी

वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरहून वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत. अंबाला-दिल्ली हायवेवर मोहडाजवळ हा भीषण अपघात रात्री २ च्या सुमारास झाला आहे. 

टेम्पो ट्रॅव्हलरची अवस्था पाहून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो. ही टेम्पो ट्रॅव्हलर निम्मी चेपली गेली आहे. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे. जखमी हायवेवर इकडे-तिकडे फेकले गेले होते. तर काही जखमी बसमध्येच अडकले होते. हायवेवरून जाणाऱ्यांनी तातडीने जखमींना मदत केली. पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचत जखमींना दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

या कुटुंबातील एक जखमी धीरज याने सांगितले की ते २३ तारखेला सायंकाळी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. अचानक ट्रेलरच्यासमोर एक वाहन आले, त्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला. यामुळे ट्रॅव्हलर मागून धडकली. 

Web Title: Ambala Tempo Traveler Accident: A family going to Vaishnodevi's darshan; Seven dead, 19 injured, including a six-month-old baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.