तरूणीच्या भोजपुरी गाण्यावरील डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 10:50 IST2022-12-05T10:48:36+5:302022-12-05T10:50:39+5:30

Patli Kamariya Mor Hai Hai: सोशल मीडिया यूजर तर हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टावर @ketki_sharma1 च्या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला 4.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

College girl dance on Bhojpuri song Patli Kamariya Mor Hai Hai video goes viral | तरूणीच्या भोजपुरी गाण्यावरील डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक

तरूणीच्या भोजपुरी गाण्यावरील डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पुन्हा पुन्हा बघताहेत लोक

Patli Kamariya Mor Hai Hai: सोशल मीडियावर पतली कमरिया मोर हाय.. हाय... या भोजपुरी गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तुम्ही या गाण्यावरील डान्सचे अनेक व्हिडीओ बघू शकता. अशात एका कॉलेज गर्लचा या गाण्यावरील डान्स व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत तरूणी या गाण्यावर काही हूक स्टेप करताना दिसत आहे. सोशल मीडिया यूजर तर हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टावर @ketki_sharma1 च्या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला 4.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओत कॉलेज यूनिफॉर्म घातलेली एक तरूणी भोजपुरी गाणं पतली कमरिया मोर हाय.. हाय... वर धमाल डान्स करताना दिसत आहे. तिने काही वेगळ्या स्टेप्स करून लोकांची मनं जिंकली आहेत. तसेच या व्हिडीओच्या  कॅप्शनला लिहिलं आहे की,  "हॅप्पी लास्ट क्लास ऑफ़ कॉलेज".

नेटिजन्सनी हे भोजपुरी गाणं फारच डोक्यावर घेतलं आहे. या गाण्यावरील अनेक डान्स व्हिडिओजना हजारो लाइक्स मिळत आहे. या तरूणीच्या व्हिडिओला तर 4.1 मिलियन वेळा बघण्यात आलं आहे. व्ह्यूजची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी तिच्या एनर्जीचं कौतुक आणि तिला खूप शुभेच्छा दिल्या. लोक या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत आहेत आणि तिच्या डान्सचं कौतुक करत आहेत.

Web Title: College girl dance on Bhojpuri song Patli Kamariya Mor Hai Hai video goes viral