Car flipping into ditch because of snow on road video shared online | धक्कादायक व्हिडीओ! रस्त्यावर जमा झाला होता बर्फाचा थर, काही सेकंदातच कार झाली पलटी!

धक्कादायक व्हिडीओ! रस्त्यावर जमा झाला होता बर्फाचा थर, काही सेकंदातच कार झाली पलटी!

अनेकदा असं होतं की, इकडे आपण पापणी हलवतो आणि तिकडे खेळ खल्लास. म्हणजे अशी काही घटना घडून जाते की ज्याचा तुम्ही विचारही केलेला नसतो. तुम्ही फक्त विचार करत बसता की हे झालं कसं? अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा भयावह व्हिडीओ समोर आला आहे. झालं असं की, रोडवर बर्फाचा थर जमा झाला होता. त्यावर कार धावत होती. अचानक कार स्लीप झाली आणि त्यानंतर जे झालं ते धक्कादायक होतं.

Nebraska State Patrol ने त्यांच्या ट्विटर पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, बर्फाचा थोडासा भागही अडचण निर्माण करू शकतो. या अपघातात दोघांनीही सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे सुदैवाने त्यांना फार लागलं नाही. व्हिडीओत बघू शकता की, आधी कार स्लीप झाली आणि नंतर अचानक रस्त्याच्या खाली जाऊन पलटली.

२०१९ ची घटना

हा व्हिडीओ २०१९ सालचा आहे. बर्फामुळे रस्त्यावर भलामोठा ट्रकही पलटी झाला होता. एक महिलेच्या कारचा टायर दोन व्यक्ती काढत असतात अशातच ट्रक आला आणि स्लीप झाला. या अपघाताचा व्हिडीओ इतका भयंकर होता की, बघणारेही घाबरले होते. इंडिया टाइम्सनुसार, या घटनेत महिलेला काही जखमा झाल्या होत्या. तर दोन व्यक्ती मरता मरता वाचले होते
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Car flipping into ditch because of snow on road video shared online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.