स्टंटच्या नादात कारचे झाले चक्क दोन तुकडे, आजपर्यंत पाहिला नसेल इतका खतरनाक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 12:30 IST2022-01-05T12:27:49+5:302022-01-05T12:30:35+5:30
Social Viral Video : सोशल मीडियावर बाइक स्टंटचे कितीतरी व्हिडीओ बघायला मिळतात. ज्यात अनेक व्हिडीओत स्टंट दरम्यान गंभीर अपघात झाल्याचंही बघायला मिळतं.

स्टंटच्या नादात कारचे झाले चक्क दोन तुकडे, आजपर्यंत पाहिला नसेल इतका खतरनाक व्हिडीओ
Social Viral Video : स्टंटचं नाव ऐकताच आपल्या डोक्यात साऊथचे सिनेमे फिरू लागतात किंवा रोहित शेट्टीच्या सिनेमातील सीन्स आठवतात. अलिकडे तर सोशल मीडियावरही अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अनेकदा हे स्टंट फसतात आणि भलतंच काहीतरी होतं.
सोशल मीडियावर बाइक स्टंटचे कितीतरी व्हिडीओ बघायला मिळतात. ज्यात अनेक व्हिडीओत स्टंट दरम्यान गंभीर अपघात झाल्याचंही बघायला मिळतं. अनेकदा तर स्टंट करणारे गंभीर जखमीही होतात. सध्या सोशल मीडियावर एका कार स्टंटचा व्हिडीओ फार चर्चेत आला आहे. यात व्यक्ती कारसोबत स्टंट करताना दिसत आहे. पण ऐनवेळी असं काही घडतं की, हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.
हा व्हिडीओ फारच हैराण करणारा आहे. यात स्टंटमॅनचा स्टंट फेल तर होतोच, सोबतच त्याच्या कारचे चक्क दोन तुकडे होतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर आधी तुम्ही थक्क व्हाल मग हसू लागाल. तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती वेगाने कार पुढे नेतो. पण पुढे असं काही घडतं ज्याची कल्पनाच कुणी केली नसेल.
या व्यक्तीचा स्टंट फेल होतो आणि काही क्षणातच कारचे दोन तुकडे होतात. सुदैवाने यावेळी तरूणाला काही इजा होत नाही. तो कारच्या सीटवर आरामात बसला आहे. हा व्हिडीओ superautovip नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.