मृतदेह कच्चा खाणाऱ्या व्यक्तीची भयानक कहाणी, तरूणीची हत्या केली आणि मग..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:16 IST2025-11-15T14:46:08+5:302025-11-15T15:16:00+5:30
Viral Murder Story: अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याने नरभक्षण आणि हत्या याबाबत धक्कादायक खुलासे केले आणि ते ऐकून लोक थरारून गेले.

मृतदेह कच्चा खाणाऱ्या व्यक्तीची भयानक कहाणी, तरूणीची हत्या केली आणि मग..
Viral Murder Story: जगात असे अनेक खतरनाक गुन्हे घडले आहेत, ज्यांची कहाणी ऐकली तरी अंगावर काटा येतो. अशीच एक कहाणी आहे निको क्लॉक्स या गुन्हेगाराची, ज्याला ‘व्हँपायर ऑफ पॅरिस’ म्हणून ओळखलं जातं. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याने नरभक्षण आणि हत्या याबाबत धक्कादायक खुलासे केले आणि ते ऐकून लोक थरारून गेले.
खरंच त्याने प्रेताचे मांस खाल्ले?
निकोने सांगितले की तो जेव्हा मॉर्गमध्ये काम करत होता, तेव्हाच त्याने पहिल्यांदा मानवी मांसाची टेस्ट घेतली. त्या क्षणीच त्याच्या मनात एक भीषण व्यसन जन्माला आलं. त्याच्या मते, त्या अनुभवाच्या तुलनेत बाकी सर्व संवेदना फिक्या आणि निरस वाटू लागल्या. मृत्यूविषयीचं त्याचं विचित्र आकर्षण बालपणातच सुरू झालं होतं. 10 व्या वर्षी आजोबांच्या मृत्यूनंतर त्याला मृतदेहांविषयी विचित्र ओढ निर्माण झाली. दोन वर्षांनी त्याने जपानी नरभक्षक इसेई सागावा याची कथा वाचली ज्याने 1981 मध्ये पॅरिसमध्ये एका डच महिलेची हत्या करून तिचे मांस खाल्ले होते. ही कथा वाचल्यानंतर निकोच्या मनात मांस फाडून खाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.
पॉडकास्टमध्ये काय उघड झाले?
‘एनीथिंग गोज’ या पॉडकास्टमध्ये त्याने सांगितलं की, त्या काळात फ्रान्समध्ये मॉर्गमध्ये काम करण्याचे नियम कडक नव्हते. ऑटोप्सी करताना तो एकटा असला की तो मृतदेहांवरून मांसाचे तुकडे कापून खात असे. सुरुवातीला तो कच्चे मांस खात असे, नंतर तो छोटे तुकडे चोरीने घरी नेऊन शिजवू लागला. पण हळूहळू हे चोरीचे मांसही त्याच्या भुकेला तृप्त करू शकत नव्हते.
ही भूक त्याला खून करण्याकडे ढकलली का?
शेवटी त्याने थियरी बिसोनियर या व्यक्ती हत्या केली, ज्याची ओळख त्याच्यासोबत ऑनलाइन झाली होती. अटक झाल्यानंतर त्याने कबूल केले की त्याने ही हत्या फक्त मानवी मांस खाण्यासाठी केली. न्यायालयाने त्याला 12 वर्षांची शिक्षा सुनावली, त्यापैकी त्याने साडेसात वर्ष तुरुंगात काढली.
टेस्टबद्दल विचारले असता त्याने सांगितले की मानवी मांसाची चव घोड्याच्या मांसासारखी असते. पण त्याच्या म्हणण्यानुसार चव हे कारण नव्हते त्याला हवी होती ती एक भीषण थ्रिल, एक असा ‘हाय’ जो त्याला सतत उत्तेजित ठेवत होता. हाच धोकादायक रोमांच त्याला पुढे खुनाकडे नेत गेला.