जिगरबाज! वर्षभरापूर्वी कॅन्सरवर मात करणाऱ्या महिलेने सलग 54 तास पोहून केला वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 14:53 IST2019-09-19T14:42:39+5:302019-09-19T14:53:03+5:30
सारा थॉमसचं संपूर्ण जगभरातून कौतुक करण्यात येत आहे. कारणंही तसंच आहे. मागील वर्षी ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर साराने यावर्षी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

जिगरबाज! वर्षभरापूर्वी कॅन्सरवर मात करणाऱ्या महिलेने सलग 54 तास पोहून केला वर्ल्ड रेकॉर्ड
कॉलोराडोमध्ये राहणाऱ्या सारा थॉमसचं संपूर्ण जगभरातून कौतुक करण्यात येत आहे. कारणंही तसंच आहे. मागील वर्षी ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर साराने यावर्षी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तिने 54 तास सलग अजिबात न थांबता पोहोण्याचा विक्रम केला आहे.
साराने हा रेकॉर्ड कोणत्याही स्विमिंग पूलमध्ये नाही केला, तर तिने इंग्लिश चॅनल म्हणजेच, इंग्लिश खाडी चार वेळा पार केली आहे. होय... तिच इंग्लिस खाडी जी फक्त एकदाच पार करताना अगदी पट्टीचे पोहोणारेही माघार घेतात. साराने सर्वांना मागे टाकलं असून हा रेकॉर्ड करणारी ती जगातील पहिली महिला आहे.
सारा थॉमस 37 वर्षांची आहे. तिने 54 तास सलग पोहून एकूण 215 किलोमीटर अंतर पार केलं आहे. साराने रविवारी इंग्लंडच्या किनाऱ्यावरून पोहोण्यास सुरुवात केली आणि मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता फ्रान्समध्ये आपली शेवटची फेरी पूर्ण केली.
आपल्या वर्ल्ड रेकॉर्डबाबत बोलताना साराने सांगितले की, 'पोहोताना मला जेलीफिशचाही सामना करावा लागत होता. याव्यतिरिक्त पाणीही फार थंड होतं. पण जेवढा मी विचार केला होता, त्यापेक्षा नक्कीच कमी होतं.'
साराने आपलं यश कॅन्सर पिडीतांना समर्पित केलं आहे. 54 तास सलग पोहोणं म्हणज, यावेळात ती अजिबात झोपली नाही. सलग एवढ्या वेळ पोहोल्यामुळे आरोग्यावर नक्कीच वाईट परिणाम होतो. परंतु, साराने याची भरपाई म्हणून इलेक्ट्रॉल आणि कॅफेन असणाऱ्या पेय पदार्थांचं सेवन करत होती. रेकॉर्ड पूर्ण करताच साराचं स्वागत शॅम्पेन आणि चॉकलेट्स देऊन करण्यात आलं.
लाइव्ह व्हिडीओमध्ये सर्वांनी पाहिला साराचा कारनामा साराने केलेल्या विक्रिमाचा एक लाइव्ह व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कॉलोराडो किनाऱ्यावर लोकांची गर्दी तिचं मनोबल वाढवताना दिसून आली. दरम्यान इंग्लिश खाडी आतापर्यंत फक्त 3 लोकांनीच पोहून पार केलं आहे.