अहो, हरणाला काय बघताय? टक लावून पाहा अन् फोटोतील शिकारी वाघाला शोधून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 15:09 IST2020-05-28T15:02:44+5:302020-05-28T15:09:48+5:30

घरी बसून आपल्या डोळ्यांना तपासण्यासाठी हा मस्त व्यायाम आहे.

Can you spot the tiger in this viral picture myb | अहो, हरणाला काय बघताय? टक लावून पाहा अन् फोटोतील शिकारी वाघाला शोधून दाखवा

अहो, हरणाला काय बघताय? टक लावून पाहा अन् फोटोतील शिकारी वाघाला शोधून दाखवा

या फोटोला पाहताच क्षणी तुम्हाला हरीण दिसून येईल. पण नीट पाहिलं तर या फोटोत खूप काही दिसेल. या फोटोमध्ये   हरणासोबतच वाघ सुद्धा आहेत.अनेकांनी टक टाकून पाहिले आणि अखेर त्यांना वाघ दिसले. कोणला एक तर कोणाला तीन वाघ दिसले.  घरी बसून आपल्या डोळ्यांना तपासण्यासाठी हा मस्त व्यायाम आहे. तुम्ही सुद्धा या दाट जंगलात लपलेल्या वाघाला शोधण्याचा प्रयत्न करू शकता.

या फोटोमध्ये सुंदर हरीण तुम्हाला दिसून येईल. या जंगलाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रमेश बिश्नोई यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. यात शिकार शिकारीशी नजरेला नजर भिडवत आहे. तुम्ही शिकारीला म्हणजेच वाघाला शोधून दाखवा.  असं आवाहन कॅप्शनमधून करण्यात आलं आहे.

या फोटोला ५०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हरीण आपले प्राण वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन उभा असल्याचे दिसून येत याहे.  लोकांनी कमेंट्समध्ये त्यांना दिसलेल्या वाघाची दिशा सांगितलेली आहे. लोकांना वाघ तर दिसला आता तुम्हाला दिसतोय का शोधून बघा.

Video : माकडानं वाघाची खोडंच मोडली; त्यानं काही करायच्या आत सणसणीत कानाखाली मारली

Video : बाबो! आगीने पेटलेला ट्रक ड्रायव्हर गावातून सुसाट चालवत होता अन्....

Web Title: Can you spot the tiger in this viral picture myb