आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपून बसला आहे एक खतरनाक बिबट्या, ९९ टक्के लोकांच्या नजरेतून वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:06 IST2021-12-29T16:04:30+5:302021-12-29T16:06:37+5:30
Social Viral Photo : व्हायरल झालेल्या या फोटो एक झाड स्पष्टपणे दिसत आहे. पण सोबतच या फोटोत एक बिबट्या असल्याचं सांगण्यात येत आहे. फोटोत सगळं काही दिसतं, पण नेमका बिबट्याच लोकांना दिसत नाहीये.

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपून बसला आहे एक खतरनाक बिबट्या, ९९ टक्के लोकांच्या नजरेतून वाचला
Social Viral Photo : सोशल मीडियावर नेहमीच काही चॅलेंजेस किंवा काही असे फोटो शेअर केले जातात ज्यावरून लोकांच्या बुद्धीला चालना मिळते. अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो शेअर केले जातात आणि त्यावरून लोकांना चॅलेंज दिलं जातं. त्यात नेमकं काय दडलं आहे हे ओळखायला सांगितलं जातं. असे फोटो पाहून लोकांनाही आनंद मिळतो आणि त्यांचा चांगला टाइमपासही होतो. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या फोटो एक झाड स्पष्टपणे दिसत आहे. पण सोबतच या फोटोत एक बिबट्या असल्याचं सांगण्यात येत आहे. फोटोत सगळं काही दिसतं, पण नेमका बिबट्याच लोकांना दिसत नाहीये. तो यात लपला आहे. लोक फोटोकडे लक्ष देऊन बारकाईने बघत असूनही बिबट्याला शोधण्यात त्यांना अपयश येत आहे. अनेकांनी तर बराच वेळ शोध घेऊन अखेर हार मानली. काही तर म्हणत आहेत की या बिबट्या आहेच नाही. पण असं नाहीये.
There is a leopard in this picture. Try to spot it. No pun intended 🥴 pic.twitter.com/xeT87wV1cy
— Amit Mehra (@amitmehra) December 27, 2021
काही तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांनी या फोटोत लपलेला बिबट्या शोधून काढला. हा फोटो ट्विटरवर अमित मेहरा नावाच्या यूजरने शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला ३ हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. तर अनेकांनी रिट्विटही केला आहे. जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही या फोटोतील बिबट्या दिसला नसेल तर तुम्हाला एक हिंट देतो. जरा झाडावरून नजर हटवून खालच्या सुकलेल्या गवताकडे लक्ष देऊन बघा.
खालच्या गवतात बिबट्या दबा धरून बसला आहे. बिबट्या हा खतरनाक शिकारी असतो. तो सहजपणे कुठेही लपून बसतो आणि आपल्या शिकारीवर हल्ला करतो. तो बाजूलाच बसलेला असतो, पण कुणाला खबरही लागत नाही.