वाळवंटात, रखरखत्या उन्हात तेल उकळुन त्यात जेवण बनवतोय हा शेफ, व्हिडिओ पाहुन सुटेल घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:41 IST2021-11-11T18:38:18+5:302021-11-11T18:41:11+5:30
एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर (chef Burak Ozdemir) यांचा असून त्यांनी तापलेल्या वाळवंटामध्य फ्रायम्स तळले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

वाळवंटात, रखरखत्या उन्हात तेल उकळुन त्यात जेवण बनवतोय हा शेफ, व्हिडिओ पाहुन सुटेल घाम
लोकांना चटपटीत खाद्यपदार्थांचे व्हिडीओ पाहायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर (chef Burak Ozdemir) यांचा असून त्यांनी तापलेल्या वाळवंटामध्य फ्रायम्स तळले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फ्रायम्स तळण्यात आले आहेत. प्रसिद्ध शेफ बुराक ओझ्देमीर यांनी ही कामगिरी करुन दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी मोठी कढई घेतलीय. ही कढई त्यांनी वाळवंटात ठेवली आहे. तसेच तेल टाकून खाली आगदेखील लावली आहे. वाळवंटात तापमान चांगलेच वाढलेले आहे. असे असूदेखील त्यांनी कढईमध्ये तेल टाकून फ्रायम्स तळले आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.
शेफ बुराक यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून भारावून गेले आहेत. अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर केला जातोय. आतापर्यंत हा व्हिडीओ १० कोटी वेळा पाहिला गेलाय. मिळालेल्या माहितीनुसार शेफ बुराक यांनी हा व्हिडीओ १७ ऑक्टोबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. सध्या हाच व्हिडीओ चर्चेत आलाय. इन्स्टाग्रामवर शेख बुराक यांचे २९.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.