Video: खतरनाक... दौन बैल भांडत असताना 'तो' सोडवायला गेला अन् बसला जोरदार झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 20:45 IST2024-02-29T20:38:22+5:302024-02-29T20:45:18+5:30
Bull Fight viral video: कुठे भांडण सुरू असेल तर काही लोक भांडण पाहण्यात किंवा व्हिडिओ बनवण्यातच वेळ घालवतात. पण ...

Video: खतरनाक... दौन बैल भांडत असताना 'तो' सोडवायला गेला अन् बसला जोरदार झटका
Bull Fight viral video: कुठे भांडण सुरू असेल तर काही लोक भांडण पाहण्यात किंवा व्हिडिओ बनवण्यातच वेळ घालवतात. पण असे म्हटले जाते की जेव्हाही कुठे भांडण होते तेव्हा भांडण सोडवणे ही आपली जबाबदारी आहे. असे असले तरीही भांडण सोडवण्यापूर्वी हे भांडण नक्की कोणाचं आहे आणि ते कोणत्या प्रकारचे आहे, हेही बघायला हवे. कारण कधी कधी मध्यस्थी करणाऱ्यांनाच त्या भांडणाचा फटका बसू शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनेकदा जेव्हा दोन बैलांमध्ये भांडण होते, तेव्हा कोणीही त्यांच्याजवळ जात नाही. पण एका व्यक्तीने भांडणाच्या वेळी मध्ये पडण्याचे धाडस केले, पण नंतर जे घडलं त्यामुळे, 'आ बैल मुझे मार..'हीच म्हण साऱ्यांना आठवली. व्हिडिओमध्ये दोन बैल रस्त्यावर आपापसात भांडत होते. एका बाजूला लोक उभे राहून त्याचा व्हिडीओ बनवत होते पण एका व्यक्तीने त्यातील एका बैलाची शेपूट ओढली. त्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या बैलाच्या बाजूला गेला आणि त्याचीही शेपूट ओढली. शेवटी त्यातल्या एका बैलाने थेट त्या व्यक्तीवरच हल्ला चढवला. त्याला धक्का मारून पाडलं आणि दोन्ही बैल पळून गेले. पाहा व्हायरल झालेला बैलांच्या झुंजीचा व्हिडीओ-
भल्लालदेव बनने आए युवक की आई शामत | pic.twitter.com/y2rGwywnXz
— Dharmesh Pandey (@Dharmeshspandey) February 29, 2024
दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील राजपुरा भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.