सुरुवातीला वाटलं वधु लाजेल पण तिने वरासोबत केलं असं काम की वऱ्हाडी झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:06 IST2022-05-03T18:04:39+5:302022-05-03T18:06:39+5:30

एक वधु-वराचा भन्नाट डान्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

bride groom dancing in wedding video goes viral on social media | सुरुवातीला वाटलं वधु लाजेल पण तिने वरासोबत केलं असं काम की वऱ्हाडी झाले अवाक्

सुरुवातीला वाटलं वधु लाजेल पण तिने वरासोबत केलं असं काम की वऱ्हाडी झाले अवाक्

लग्न हा प्रत्येक वधु वरांच्या आयुष्यातील खास दिवस असतो. आजकाल हाच दिवस अधिक खास करण्यासाठी अनेक वधु वर काही हटके आणि भन्नाट गोष्टी करतात. त्यातील काही क्युट मोमेंट्स सोशल मिडियावर व्हायरल होतात. असाच एक वधु-वराचा भन्नाट डान्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता की वरमालेचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. अशातच गाणे सुरु होते व नवरा त्या गाण्यावर ठेका धरतो. खरंतर वधु लग्नसोहळ्यामध्ये थोडी लाजरीबुजरी असते. पण या नवरीने नवऱ्यासोबत या गाण्यावर ठेका धरला आहे. दोघेही त्यांच्या लग्नाचा मनापासून आनंद घेत आहे. जणू काही लग्न झाल्यानंतर नव्या आयुष्याचा उत्साह त्यांच्या अंगात संचारला आहे.

वधु वराचा हा भन्नाट डान्स अनेकांना आवडला आहे. अनेक नेटकरी यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. witty_wedding या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Web Title: bride groom dancing in wedding video goes viral on social media