भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 12:10 IST2020-12-06T12:02:13+5:302020-12-06T12:10:48+5:30

Treading Viral Videos in Marathi : सध्या  सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. असा नवरीचा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. 

Bride entry on saiyaan superstar song watch video viral 4 | भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ

भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ

कोरोनाकाळातही अनेक घरांमध्ये लग्न होताना दिसून येत आहेत. कोरोनाच्या प्रभावामुळे अनेकांची ठरलेली  लग्न रद्द झाली तर कोणाची तारीख  पुढे ढकलण्यात आली. आता अनलॉक सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकांनी आपले राहिलेले समारंभ आटपायला सुरूवात केली आहे. सध्या  सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. असा नवरीचा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरी मुलगी नाचत नाचत मंडपात एंट्री करत आहे. सैंया सुपरस्टार या गाण्यावर ही नवरी  डान्स करत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातलाच असल्याचे सांगितले जात आहे. मराठमोळ्या साडीत गॉगल लावून ही नवरीमुलगी लग्नाच्या मंडपात दाखल झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर प्रवीण गावीट यांनी शेअर केला आहे. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला आले आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिट्विट करत कसा वाटला नवरीचा डान्स असं विचारलं आहे. राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

 साडीवाल्या बाईचा 'हा' स्टंट पाहून भल्याभल्याची उडालीये झोप

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला जमिनीवर साडी घालून बॅकफ्लिप मारत आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, महिला सगळं काही करू शकतात जे पुरूष करू शकतात. इतकंच नाही पुरूषांपेक्षा अधिक चांगले करू शकतात. इंटरनेटवर हा व्हिडीओ रेकॉर्ड तोड व्हायरल होत आहे. या महिलेला काहीजणांना टँलेंटचे पावरहाऊस असं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ २० नोव्हेंबरला  इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. सोशल मीडिया युजर्सकडून या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Bride entry on saiyaan superstar song watch video viral 4