राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 06:48 PM2020-12-04T18:48:39+5:302020-12-04T19:00:46+5:30

Trending News in Marathi : अक्षता मुर्ती यांच्या  संपत्तीचा खुलासा केल्यानंतर आता ब्रिटनच्या सगळ्यात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. अक्षता यांची संपत्ती ब्रिटनची राणी एलिजाबेथ यांच्यापेक्षाही जास्त आहे.

Akshata, the daughter of the Narayan idols, is richer than the idols of Queen Elizabeth; | राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

googlenewsNext

भारताचे सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या प्रसिद्ध इंफोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे वित्तमंत्री  ऋषि सुनक हे संपत्तीची पूर्ण माहिती न दिल्यामुळे वाद्याच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर मालमत्तेसंबंधी माहिती लपवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.  दरम्यान मुर्ती यांची कन्या अक्षता हिची इंफोसिसमध्ये 0.91 टक्के भागीदारी आहे. याची एकूण रक्कम 4300 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे ऋषि सुनक यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये आपल्या पत्नीच्या संपत्तीचा उल्लेख केलेला नाही. 

संपत्ती  जाहिर करणं अनिवार्य 

गेल्या काही महिन्यांपासून ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्याकडे संपत्तीबात खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. सुनक यांनी आपल्या संपत्तीबाबत माहिती दिली असून आपल्या पत्नीच्या संपत्तीबाबत माहिती दिली नव्हती. यावरून प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान ब्रिटनमध्ये प्रत्येक मंत्र्याला आपली संपत्ती  घोषित करणं अनिवार्य आहे. ब्रिटिश वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सुनक यांनी मिनिस्टरियल कोडचे  उल्लंघन केलेले नाही. 

अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या १५ वर्षीय चिमुरडीने मिळवला पहिला TIME अवॉर्ड, बनली 'किड ऑफ द ईयर'

अक्षता मुर्ती यांच्या  संपत्तीचा खुलासा केल्यानंतर आता ब्रिटनच्या सगळ्यात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. अक्षता यांची संपत्ती ब्रिटनची राणी एलिजाबेथ यांच्यापेक्षाही जास्त आहे. संडे टाइम्सने दिल्या माहितीनुसार ब्रिटनची माहाराणी एलिजाबेथ यांची संपत्ती एकूण 3500 कोटी इतकी होती. अक्षता यांची संपत्ती 4300 कोटी इतकी आहे. इंफोसिस कंपनी व्यतिरिक्त अक्षता यांची अनेक कंपन्यांमध्ये भागिदारी आहे.

काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....

२००९ मध्ये झालं होतं लग्न

ऋषि सुनक यांची संपत्ती जवळपास २००० कोटी इतकी आहे. यामुळेच ब्रिटनच्या सगळ्यात  श्रीमंत खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. अक्षता मुर्ती आणि ऋषी सुनक यांचे लग्न २००९ मध्ये झालं. या दोघांची भेट स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना झाली. त्यानंतर या दोघांच्याही मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ऋषि सुनक यांचे आई वडील ६० व्या दशकात पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले.

Web Title: Akshata, the daughter of the Narayan idols, is richer than the idols of Queen Elizabeth;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.