काय झालं नवरीला? नवरदेवाला पाहताच सुटला ताबा, धावत आली रस्त्यावरन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 22:26 IST2021-08-22T15:42:59+5:302021-08-22T22:26:31+5:30

एका नवरीला मात्र नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी इच्छा झाली ती स्वतःवर ताबाच ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत नवरदेवाची प्रतीक्षा करत करण्याऐवजी ती थेट लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली.

bride dancing on song to welcome groom video goes viral | काय झालं नवरीला? नवरदेवाला पाहताच सुटला ताबा, धावत आली रस्त्यावरन अन्...

काय झालं नवरीला? नवरदेवाला पाहताच सुटला ताबा, धावत आली रस्त्यावरन अन्...

लग्नामध्ये (Wedding video) प्रत्येक नवरी आपल्या नवरदेवाची आतुरतेने वाट पाहत असते. एका नवरीला मात्र नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी इच्छा झाली ती स्वतःवर ताबाच ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत नवरदेवाची प्रतीक्षा करत करण्याऐवजी ती थेट लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली (Bride dance video).

सोशल मी़डियावर (Social media) लग्नाचा हा भारी व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत आहे. नवऱ्याला पाहून नवरीला इतका आनंद झाला की ती स्वतःच त्याच्या स्वागतासाठी आली. लग्नमंडप सोडून ती रस्त्यावरच धावत गेली आणि तिथंच तिने धिंगाणा घातला.  तिने रस्त्यावर असं काही केलं की तिला पाहून नवरदेव तसाच स्तब्ध उभा राहिला. नवरीचं हे रूप पाहून त्याला काही सुचेना.

तुम्ही व्हिडिओत पाहु शकता की अगदी बिनधास्त, जोशात नवरी नवरदेवासमोर नाचताना दिसते आहे. अगदी हटके पद्धतीने तिने नवरदेवाचं स्वागत केलं आहे. नवरीचं हे रूप पाहून नवरदेवही शॉक झाला. वऱ्हाडीही नवरीच्या या हटके स्वागताचं भलतंच कौतुक करताना दिसत आहेत.

आयएएस अधिकारी @pnarahari यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आगे. एक नवरी नवरदेवासाठी नाचते आहे. त्याला आपल्या आयुष्यात मिळवून ती खूप आनंदी दिसते आहे, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

Web Title: bride dancing on song to welcome groom video goes viral