बोंबला! मंडपात बसून नवरदेव खात होता गुटखा, नवरीने घेतली त्याची अशी शाळा की....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:17 IST2021-08-28T14:16:57+5:302021-08-28T14:17:45+5:30
अचानक मंडपात बसलेल्या नवरीला समजतं की, तिचा नवरदेव गुटखा खात आहे. हे बघून तिचा पारा चढतो. हे बघून लोकांना हसू फुटलं आहे.

बोंबला! मंडपात बसून नवरदेव खात होता गुटखा, नवरीने घेतली त्याची अशी शाळा की....
पान-मसाला किंवा गुटखा खाण्यात भारतीय लोक पटाईत आहेत. काही लोक तर लग्नकार्यावेळीही आपलं गुटख्यावरील प्रेम लपवू शकत नाही. त्यामुळे अनेकांची लग्नेही तुटतात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यात नवरी नवरदेवाची शाळा घेताना दिसत आहे. कारण नवरदेव साहेब मंडपात बसून गुटखा खात होते.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम यूजर @official_niranjanm87 ने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे समजलं नसलं तरी व्हिडीओ लोकांना आवडत आहे. व्हिडीओ बघू शकता की, अचानक मंडपात बसलेल्या नवरीला समजतं की, तिचा नवरदेव गुटखा खात आहे. हे बघून तिचा पारा चढतो. हे बघून लोकांना हसू फुटलं आहे. (हे पण वाचा : रोमँटीक मुड मध्ये सायकलवर होते काका-काकी, इतक्यात पाहिला कुत्रा अन् शेवट झाला असा की...)
तु्म्ही व्हिडीओ बघू शकता की, नवरी-नवरदेव मंडपात बसले आहेत. अचानक नवरी पंडिताला थांबण्यास सांगते आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीला रागाने मारते. यावेळी नवरदेवाच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाही. नंतर नवरीने त्यालाही एक झापड मारते आणि जोरात ओरडते की, तोंडात गुटखा आहे. थुंकून ये आधी. त्यानंतर नवरदेव उठतो आणि गुटखा थुंकून येतो.