फक्त एका कापडावरून लग्नात भिडले वधु आणि वराकडील मंडळी, वाद केला विकोपाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:07 IST2021-08-25T18:06:34+5:302021-08-25T19:07:09+5:30

फक्त एका कापडासाठी वधू पक्ष आणि वर पक्ष आपआपसात भिडले. त्यांच्यातला वाद अत्यंत विकोपाला गेला मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. 

bride and groom relatives fight for one clothe funny video goes viral on internet | फक्त एका कापडावरून लग्नात भिडले वधु आणि वराकडील मंडळी, वाद केला विकोपाला अन्...

फक्त एका कापडावरून लग्नात भिडले वधु आणि वराकडील मंडळी, वाद केला विकोपाला अन्...

लग्न म्हटलं की अनेक रुढी अन् परंपरा आल्या. मग त्यावरून होणारे  रुसवे-फुगवे, मानपानही आलेच. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल  होतो आहे. ज्यात वधू पक्ष आणि वर पक्ष फक्त एका कापडासाठी आपसात भिडले. त्यांच्यातला वाद अत्यंत विकोपाला गेला मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. 

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी समोरासमोर बसले आहेत. त्यांचे मागे त्यांचे नातेवाईक उभे आहेत. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी नवरा-नवरीच्या डोक्यावर एक कापड धरलेलं आहे. हे कापड मिळवण्यासाठी दोन्हीक़डची मंडळी चढाओढ करत आहेत. पुर्ण ताकदीनिशी त्या कापडाला खेचत आहेत. अखेर वरपक्ष आपल्याकडे कापड खेचण्यात यशस्वी होतं आणि त्याचवेळी नवरीकडील मंडळी धाडकन कोसळतात. एक महिला आणि पुरुष तर नवरा-नवरीच्या समोरच जाऊन पडते. निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहुन नेटकरी खो-खो हसत आहेत. तसेच या व्हिडिओर बऱ्याच कमेंट्सही येत आहेत.

Web Title: bride and groom relatives fight for one clothe funny video goes viral on internet