लग्नातच नवरदेवाला चोपून काढलं नवरीबाईनं, मंडपातच झाली फ्री स्टाईल हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 20:34 IST2022-08-09T20:32:18+5:302022-08-09T20:34:17+5:30

लग्नातच नवरीबाईने नवरदेवाला चोपून काढलं आहे. लग्न लागत असताना अचानक तिच्या रागाचा पारा चढला आणि ती नवरदेवाला चोप चोप चोपू लागली.

bride and groom fight see what happens next video goes viral on social media | लग्नातच नवरदेवाला चोपून काढलं नवरीबाईनं, मंडपातच झाली फ्री स्टाईल हाणामारी

लग्नातच नवरदेवाला चोपून काढलं नवरीबाईनं, मंडपातच झाली फ्री स्टाईल हाणामारी

 बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात रोमँटिक, भावुक आणि मजेशीर क्षणही पाहायला मिळतात. पण सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. लग्नातच नवरीबाईने नवरदेवाला चोपून काढलं आहे. लग्न लागत असताना अचानक तिच्या रागाचा पारा चढला आणि ती नवरदेवाला चोप चोप चोपू लागली.

लग्नात नवरीबाईने अचानक रौद्र रूप धारण केलं आणि लग्नमंडप काही क्षणातच कुस्तीच्या आखाड्यात बदललं. नवरदेवाने असं काही केलं नवरीबाई भडकली. त्याचं कृत्य पाहून तिने त्याला पाहुण्यांसमोरच मारायला सुरुवात केली.

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांच्यासमोर बसले आहेत. नवरदेव आपला हात उचलून नवरीच्या गालाला लावायला जातो. त्यानंतर नवरीबाईला राग येतो. ती आऊट ऑफ कंट्रोल होते. ती इतकी भडकते की नवरदेवाला मारायलाच लागते. सुरुवातीला त्याला हातांनी मारते. त्यानंतर मागचा पुढचा कोणताच विचार न करता ती त्याच्यावर अक्षरशः तुटून पडते. तिथं असलेल्या महिला तिला आवरण्याचा प्रयत्न करतात पण ती कुणालाच आवरत नाही. किती भयानक पद्धतीने ती नवरदेवाची धुलाई करते ते तुम्ही पाहूच शकता.

नवरीने नेमकी का मारहाण केली, याचं कारण काही यातून समजत नाही. नवरदेवाने गालाला स्पर्श केला म्हणून तिला राह आला की आधीपासूनच ती रागावलेली होती. याची माहिती नाही. पण व्हिडीओ पाहून जितका धक्का बसतो, तितकंच आपल्याला हसूही येतं.

kaunhainyehlog इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. लग्न होत आहे की लढाई, मंडपातच घटस्फोट झाला, जेव्हा बेस्ट फ्रेंड एकमेकांशी लग्न करतात. अशा कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय सुचतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

Web Title: bride and groom fight see what happens next video goes viral on social media