मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:39 IST2025-12-03T17:36:57+5:302025-12-03T17:39:06+5:30
कधीकधी सोशल मीडियावर असा क्षण येतो जो हृदयाला भिडतो. अशाच एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोकांना भावुक करत आहे.

मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
कधीकधी सोशल मीडियावर असा क्षण येतो जो हृदयाला भिडतो. अशाच एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोकांना भावुक करत आहे. १२ वर्षांच्या एका मुलीने पहिल्यांदाच तिच्या आईचा आवाज ऐकला आणि एका सेकंदात तिच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीने तिच्या जन्मानंतर पहिल्यांदाच आईचा आवाज ऐकला होता. या खास क्षणाचा व्हिडीओ लाखो लोकांची मनं जिंकत आहे.
हा व्हिडीओ ब्राझीलमधील एका ऑडिओलॉजी क्लिनिकमधील आहे, जिथे ही मुलगी हियरिंग टेस्टसाठी बसली आहे. डिव्हाइस चालू होताच डॉक्टर विचारतात, "तुला आवाज ऐकू येतोय का?" मुलीच्या डोळ्यांत चमक पाहायला मिळते. तिचा चेहरा आनंदाने फुलतो... समोर बसलेली तिची आई बोलताच, ती मुलगी स्वतःला रोखू शकत नाही. पहिल्यांदाच मुलीला तिच्या आईचा आवाज ऐकून खूप भारी वाटतं.
💖👂 Un momento que rompe el corazón: Laís Vitória, una niña de 12 años con sordera, escuchó por primera vez la voz de su mamá gracias a un implante coclear
— adn Noticias (@adnnoticiasmx) November 26, 2025
📽La emotiva reacción quedó captada en video y ya le está dando la vuelta al mundo pic.twitter.com/b6C0iguMMf
व्हिडिओनुसार, ही मुलगी लहानपणापासूनच ऐकू शकत नव्हती. जेव्हा तिला पहिल्यांदाच हियरिंग डिव्हाईस लावण्यात आलं तेव्हा तिने आवाज ऐकला. आईचा आवाज ऐकून ती आणखी खूश झाली. तिच्या चेहऱ्यावरील रिएक्शन, आश्चर्य, आनंद आणि भावना सर्व एकाच फ्रेममध्ये कैद झाल्या.
"हे एखाद्या चमत्कारासारखे आहे" असं एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने मुलीचं हसू सर्वकाही सांगतं असं म्हटलं आहे. लोकांनी डॉक्टरांचं देखील भररून कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.