मन लावून पतंग उडवत होता मुलगा, तेव्हा त्याच्यासोबत जे घडलं ते बघून पोटधरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:26 IST2025-01-14T15:26:13+5:302025-01-14T15:26:45+5:30

लहान मुलांचे पतंग उडवतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पतंग उडताना ही मुलं इतकी हरवून जातात की, त्यांना कशाचच भान नसतं. 

Boy flying kite pants down funny viral video | मन लावून पतंग उडवत होता मुलगा, तेव्हा त्याच्यासोबत जे घडलं ते बघून पोटधरून हसाल!

मन लावून पतंग उडवत होता मुलगा, तेव्हा त्याच्यासोबत जे घडलं ते बघून पोटधरून हसाल!

आज मकर संक्रांत आहे. यानिमित्तानं देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये  पतंग उडवून हा सण साजरा केला जात आहे. शहरांमध्ये पतंग उडवणारे अनेक लोक दिसतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पतंग उडवण्याचा मोह आवरता येत नाही. पण लहान मुलांचा उत्साह जरा जास्तच असतो. लहान मुलांचे पतंग उडवतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पतंग उडताना ही मुलं इतकी हरवून जातात की, त्यांना कशाचच भान नसतं. 

मकर संक्रांतीच्या निमित्तानं सोशल मीडियावर एका पतंग उडवणाऱ्या मुलाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो घराच्या छतावरून पतंग उडवताना दिस आहे. तो पतंग उडवण्यात किती दंग आहे हे दिसत आहे. अचानक त्याच्यासोबत एक घटना घडते. पण तरीही तो पतंग उडवण्यात बिझी आहे.

@sukun_e_kashi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बनारसमधील असल्याचं सांगण्यात आलं. हा मुलगा छतावरून पतंग उडवत आहे. पण तेव्हाच त्याच्यासोबत मजेदार गोष्ट घडते. तो पतंग उडवत असताना त्याची पॅंटी खाली घसरते. पण तो पॅंट वर करण्याऐवजी पतंग उडवत राहतो. या मुलाचा पतंग उडवण्याचा इंटरेस्ट आणि जिद्द बघू लोक अवाकही झालेत आणि पोटधरून हसतही आहेत.

Web Title: Boy flying kite pants down funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.