Nora Fatehi Viral Video: नोरा फतेहीसाठी खास क्षण! स्वत: स्टेडियममध्ये असतानाच घडली 'ती' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 13:36 IST2022-11-30T13:35:42+5:302022-11-30T13:36:19+5:30
नोराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चर्चेचा विषय ठरतोय

Nora Fatehi Viral Video: नोरा फतेहीसाठी खास क्षण! स्वत: स्टेडियममध्ये असतानाच घडली 'ती' गोष्ट
Nora Fatehi Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला आहे. मात्र ती तिच्या नृत्याविष्कारांसाठी जास्त चर्चेत असते. तशातच FIFA World Cup 2022 मधील तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिने यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्मन्स दिला. तिच्या या मोहक कामगिरीमुळे नोराने आता जेनिफर लोपेझ आणि शकीराच्या पंगतीत स्थान पटकावले. जेनिफर आणि शकीरा या दोघींनी फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतर आता अशा मोठ्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी नोरा ही एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली. या संदर्भातील एक व्हिडीओ नोराने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला.
या व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. कारण तिचे गाणे त्या स्टेडियममध्ये वाजवले जात आहे. फिफा विश्वचषकात परफॉर्मन्स देत असताना ती खूप आनंदी दिसत आहे. आधी नोरा फतेही फिफा वर्ल्डमध्ये परफॉर्म करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. नोरा आपल्या दमदार नृत्याने साऱ्यांनाच भुरळ घातली. नोराने काही बॅकग्राउंड डान्सर्ससोबतही परफॉर्मन्स दिला. तिने चमकदार पोशाख घातला होता, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच ग्लॅमरस झाला.
या दरम्यान नोरा फतेहीने अनेक गाण्यांवर नृत्य केले. त्यात बॉलीवूड आयटम नंबर आणि अधिकृत फिफा विश्वचषक गीत 'लाइट द स्काय' समाविष्ट होते. हा व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी नोराने तिचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अधिकृत फिफा विश्वचषक गीत 'लाइट द स्काय'च्या तालावर नाचताना दिसली. उत्साहाने नोरा म्हणाली, "हा माझा आवाज आहे." तिच्या या व्हिडीओत तिच्या चेहऱ्यावरील आनंद चाहत्यांनाही नक्कीच आनंद देईल, हे नक्की.