बाईकचा स्टंट ठरला जीवाशी खेळ, रस्त्यावरच धडकला टँकरला आणि झाला जीवघेणा ब्लास्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 02:04 PM2021-10-29T14:04:46+5:302021-10-29T14:10:06+5:30

एका बाईक स्टंटचा (Bike accident video) धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. स्टंट करणाऱ्या बाईकस्वारचा भयंकर अपघात झाला आहे.

bike stunt accident with tanker turns into blast shocking video goes viral | बाईकचा स्टंट ठरला जीवाशी खेळ, रस्त्यावरच धडकला टँकरला आणि झाला जीवघेणा ब्लास्ट

बाईकचा स्टंट ठरला जीवाशी खेळ, रस्त्यावरच धडकला टँकरला आणि झाला जीवघेणा ब्लास्ट

Next

अनेकदा काही तरुण बाईकवर खतरनाक स्टंट (Bike stunt video) करताना दिसतात.  मात्र अशी हिरोगिरी त्यांच्या जीवावरही बेतू शकते याची त्यांना कल्पना नसते. अशाच एका बाईक स्टंटचा (Bike accident video) धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. स्टंट करणाऱ्या बाईकस्वारचा भयंकर अपघात झाला आहे.

एक तरुण रस्त्यावर सुसाट बाईक पळवत होता. या भरधाव बाईकवर तो स्टंटही करत होता. बऱ्याच गाड्या असणाऱ्या रस्त्यावर तो वेडीवाकडी कशीही बाईक चालवत होता. पण त्याची ही हिरोगिरी त्याला चांगलीच महागात पडली. एका टँकरला त्याची बाईक धडकली आणि त्यानंतर मोठा स्फोट होऊन तरुण हवेत उडाला. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. असं करू नका. हिरोची हिरोपंती बाहेर पजली, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: bike stunt accident with tanker turns into blast shocking video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.