ट्रेनमध्ये बसण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल; झोका बांधून बसायला गेला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:23 PM2023-12-22T12:23:06+5:302023-12-22T12:24:04+5:30

स्वस्त आणि सवलतीच्या दरातील रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्याना परवडणारा असतो. पण बऱ्याचदा रेल्वेतून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. 

bihar train youngsters funny idea for seat and fall down in train video goes viral on social media  | ट्रेनमध्ये बसण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल; झोका बांधून बसायला गेला अन्....

ट्रेनमध्ये बसण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल; झोका बांधून बसायला गेला अन्....

Viral Video : बऱ्याचदा काहीजण लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये वाट काढत प्रवास करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम असते. बसण्यासाठी सीट मिळावी यासाठी कोणी ट्रेनमध्ये पेपर टाकून खाली बसतात, तर कोणी ट्रेनच्या दरवाजाला लटकून प्रवास करतात. असाच बिहार ट्रेनमधील तरुणाचा भन्नाट जुगाड पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

अलिकडेच सोशल मीडियावर बिहारमधील ट्रेनमध्ये तरुणाने केलेला जुगाड चर्चेत आला आहे. सीट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये  एकच हशा पिकला आहे. बसायला सीट नाही म्हणून चक्क या पठ्ठ्याने ट्रेनमध्ये झोका बांधल्याचे पाहायला मिळते आहे. आपल्याकडील चादरीचा झोका बांधून या तरुणाने बसण्याची सोय केली खरी पण त्याची ही युक्ती फोल ठरली. 

व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण बसण्यासाठी चादरीचा झोका बांधताना दिसतोय. झोका बांधल्यानंतर त्यामध्ये थोडा वेळ तो बसतो. पण त्याच्या वजनाने हा झोका खाली येतो, त्यामुळे तो ट्रेनमध्ये जोरात आपटतो. त्यामुळे ट्रेनमध्ये असलेले इतर प्रवासी त्याच्यावर हसू लागतात. सीटची सोय करण्यासाठी गेला आणि कंबरडे मोडून आला अशी गत या तरुणाची झाली. 

एक्सवर एका यूजरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. शिवाय नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

येथे पाहा व्हिडीओ:

Web Title: bihar train youngsters funny idea for seat and fall down in train video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.