हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:30 IST2025-10-03T13:29:37+5:302025-10-03T13:30:38+5:30
Bihar News: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
Bihar News: बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील सौदागर पट्टी परिसरात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एक महिला तिच्या तीन वर्षीय मुलासह कपड्यांच्या दुकानाबाहेर उभी होती. यावेळी अचानक हाय-टेन्शन वायर महिलेच्या अंगावर पडणार होती, तेवढ्यात मुलाने आपल्या आईला बाजुला खेचल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी(२ ऑक्टोबर) दुपारी एक महिला आपल्या तीन वर्षाीय मुलासोबत कपड्यांच्या दुकानाबाहेर उभी होती. लहान मुलगा इकडे-तिकडे पाहत होता. अचानक मुलाचे लक्ष वर गेले अन् त्याला वीजेच्या तारेत स्पार्किंग झाल्याचे दिसले. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या आईचा हात घट्ट पकडला आणि तिला बाजूला ओढले.
किशनगंज में 3 साल के बच्चे ने अपनी मां की जान बचाई। लोग इसे किसी ईश्वरीय चमत्कार से कम नहीं मान रहे हैं। #Biharpic.twitter.com/iws1up0XH2
— NBT Bihar (@NBTBihar) October 3, 2025
आईला बाजुला ओढताच ११ हजार वोल्टची हाय टेंशन तार तिथे पडली. मुलाने जर वेळेत आईला खेचले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता. हा थरकाप उडवणारा प्रसंग दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला. घटनेच्या वेळी परिसरातील नागरिक क्षणभर स्तब्ध झाले होते. एनबीटी बिहारने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
हा संपूर्ण प्रकार अवघ्या पाच सेकंदांत घडला. फुटेज पाहून तर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले की, एवढ्या लहान वयात मुलाने इतक्या चपळाईने धोका ओळखून आईला वाचवले. सध्या या घटनेचा परिसरात जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही लोक त्या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत.