Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:29 IST2025-12-06T15:28:27+5:302025-12-06T15:29:29+5:30
एक नवरदेव त्याच्या स्वतःच्या लग्नमंडपात फ्री फायर गेम खेळताना दिसत आहे.

Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, बिहारच्या नवादा जिल्ह्यातील. व्हिडिओमध्ये एक नवरदेव त्याच्या स्वतःच्या लग्नमंडपात फ्री फायर गेम खेळताना दिसत आहे. मंत्र सुरू असताना आणि नातेवाईक विधी करत असताना नवरदेव मात्र त्याच्या मोबाईलमध्ये मग्न आहे. या व्हि़डीओची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
व्हिडिओमध्ये नवरदेव मंडपात बसलेला दिसतो, त्याच्या बाजुला नवरी देखील आहे. परंतु त्याचं लक्ष मंत्रांवर किंवा लग्नाच्या विधींवर नाही. तर संपूर्ण लक्ष त्याच्या मोबाईल स्क्रीनवर सुरू असलेल्या फ्री फायर गेमवर आहे. आसपासचे लोक नवरदेवाच्या कृतीवर हसताना दिसतात. काही लोकांनी आपल्या फोनमध्ये हा व्हिडीओ काढला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट होताच हा व्हिडीओ व्हायरल झाला, लोक तो शेअर करत आहेत आणि विविध प्रकारे यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी चिंता व्यक्त केली आणि ते गेमिंग व्यसनाचे उदाहरण असल्याचं म्हटलं. काहींनी म्हटलं की हा फक्त एक मजेदार क्षण आहे. संपूर्ण बिहारमध्ये हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.शादी के मंडप में \'फ्री फायर\' गेम खेलने लगा दूल्हा...
\— तत्त्वमसि (@dhirenpurohit) December 6, 2025
शादी होती रहेगी, गेम चलता रहेगा।
😂😂 pic.twitter.com/OIfQ6ywHj9
या व्हिडिओवर नवादा पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाने कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. यापूर्वी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असले तरी नवरदेव लग्न सोडून गेम खेळत असल्याचं लोकांसाठी नवीन आहे.