ऑर्केस्ट्रा डान्सर तरूणीशी स्टेजवर केलं लग्न, Video झाला व्हायरल; पण आता आला 'कहानी में ट्विस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:19 IST2025-02-19T17:19:14+5:302025-02-19T17:19:55+5:30

Bihar Boy sindoor marries Orchestra Dancer Girl: बिहारमध्ये एका तरुणाने स्टेजवर चढून ऑर्केस्ट्रा डान्सरच्या भांगेत कुंकू भरत तिच्याशी लग्न केलं होतं. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

Bihar Boy Applies Sindoor On Orchestra Dancer Forehead Marries Her On Stage video Goes Viral but new twist in the tale | ऑर्केस्ट्रा डान्सर तरूणीशी स्टेजवर केलं लग्न, Video झाला व्हायरल; पण आता आला 'कहानी में ट्विस्ट'

ऑर्केस्ट्रा डान्सर तरूणीशी स्टेजवर केलं लग्न, Video झाला व्हायरल; पण आता आला 'कहानी में ट्विस्ट'

Bihar Boy sindoor marries Orchestra Dancer Girl: बिहारमधील नालंदा येथे वसंत पंचमीच्या दिवशी एका तरुणाने सार्वजनिकरित्या स्टेजवर चढून एका ऑर्केस्ट्रा डान्सर तरुणीच्या भांगेत कुंकू भरले आणि सर्वांसमोर तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. हा व्हिडिओ काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणाची सर्वत्र चर्चादेखील सुरू आहे. पण आता मात्र या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे.

आधी दोघांमध्ये स्टेजवर संवाद-

मुलाने स्टेजवरच मुलीच्या भांगेत भरलं कुंकू

नेमके काय आहे प्रकरण?

ऑर्केस्ट्रा डान्सर तरुणीचे नाव आहे पारो आरती. पारोने सोशल मीडियावर एकामागून एक अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. तिने सांगितले की, भांगेत कुंकू लावलेला तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तिच्या कुटुंबाने तिच्याशी असलेले संबंध तोडले आहेत. त्याबाबत तिला खंत आहेच. पण आता प्रकरणात नवा ट्विस्ट असा की, त्या मुलाचाही कुठेच पत्ता नाहीये, ज्याने तिला पत्नी मानले आहे. ऑर्केस्ट्रा डान्सर तरुणीने सांगितले की गेल्या तीन दिवसांपासून तो तरुण तिचा फोनही उचलत नाहीये. तसेच त्या मुलाचे कुटुंबीयही त्या मुलीला स्वीकारत नाहीयेत आणि तिच्याबद्दल मुलाचे वडील काही खोट्या गोष्टी पसरवत आहेत.

तरुणीने लावले आरोप-

'ती' तरुणी बांगलादेशी आहे?

पारो आरतीने असा आरोप केला आहे की, ते लोक मला बांगलादेशी म्हणत आहेत. पण मी बिहारचीच आहे. मी बांगलादेशी नाही. वसंत पंचमीच्या दिवशी गुलशन नावाच्या मुलाने मला मागणी घातली आणि सर्वांसमोर माझा स्वीकार केला. मी त्या मुलाला ओळखतही नाही. तो दारू पिऊन स्टेजवर आला आणि नंतर त्याने तसे कृत्य केले. पण मी आता त्याची पत्नी आहे आणि त्याच्यात घरी राहीन. कारण माझ्या कुटुंबाला मी ऑर्केस्ट्रामध्ये नाचण्याच्या कल्पनेने आधीच राग आला होता, त्यात आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे ते मला घरातही घेत नाहीयेत. मला कुठे जायचे ते समजत नाहीये असा पेच तिच्यापुढे आहे.

Web Title: Bihar Boy Applies Sindoor On Orchestra Dancer Forehead Marries Her On Stage video Goes Viral but new twist in the tale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.