Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:44 IST2025-10-23T15:42:27+5:302025-10-23T15:44:25+5:30
Girl Dance Viral Video: तरुणीच्या 'देसी' स्टाईल आणि जबरदस्त डान्सने सर्वांना वेड लावले आहे.

Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
आजकाल सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि हटके व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका तरुणीने 'देसी' स्टाईल आणि जबरदस्त डान्सने सर्वांना वेड लावले आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका मुलीने अगदी खास अंदाजात भोजपुरी गाण्यावर डान्स केला आहे, यात तिने काळ्या रंगाचा शर्ट आणि लुंगी घातली आहे. तर, डोक्याला 'गमछा' बांधला आहे. या युनिक स्टाईलमध्ये तिने भोजपुरी गाण्यावर जी मूव्हमेंट्स आणि एक्सप्रेशन दाखवले आहेत, ते पाहून ती प्रोफेशनल भोजपुरी नायिका आहे की सामान्य मुलगी, हे ओळखणे कठीण होते. तिचा नृत्य करण्याचा आत्मविश्वास आणि एनर्जी इतकी मंत्रमुग्ध करणारी आहे की, युजर्स तिच्यावर फिदा झाले आहेत.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @tannuyadav914 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करत असून प्रत्येकजण या तरुणीची स्टाईल आणि एनर्जीची प्रशंसा करत आहे. एका व्यक्तीने कमेंटमध्ये अहिराणी बहिण जिंदाबाद असे म्हटले आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "ताई, एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही!" या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, कोणताही पोशाख किंवा पार्श्वभूमी असो, जर तुमच्याकडे आत्मविश्वास आणि कला असेल, तर तुम्ही क्षणार्धात सोशल मीडिया स्टार बनू शकता.