बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:03 IST2026-01-07T19:02:54+5:302026-01-07T19:03:39+5:30

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होत असतात. अशीच एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

bengaluru dosa batter seller do two jobs to support his daughter education | बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक

फोटो - nbt

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होत असतात. अशीच एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बंगळुरूचा राजू आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी दोन नोकऱ्या करत आहेत. त्याचं काम आणि मुलीच्या शिक्षणाप्रती असलेलं समर्पण सर्वांनाच प्रेरणा देत आहे. राजू हा डोसा बॅटर विकत असून त्याच्या आयुष्यातील संघर्ष आता 'X' (ट्विटर) वरील एका पोस्टमुळे जगासमोर आला आहे.

मुलीला उच्च शिक्षण द्यायचं होतं, म्हणून राजू आपल्या नियमित नोकरीसोबतच डोसा बॅटर विकण्याचं कामही करू लागले. ही दोन्ही कामे करताना त्याला आज १५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्याची मेहनत आणि जिद्द पाहून त्याच्या एका ग्राहकाने त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि आता सर्वजण राजूचं भरभरून कौतुक करत आहेत.

इन्व्हेस्टर संदीप आर. यांनी पुढाकार घेतला नसता, तर राजूबद्दल जगाला कधीच कळालं नसतं. संदीप गेल्या १५ वर्षांपासून राजकडूनच डोसा बॅटर खरेदी करत आहेत. त्यांनी इतक्या वर्षांत राजूचा संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे. ६ जानेवारी रोजी त्यांनी राजूशी संबंधित एक पोस्ट 'X' वर शेअर केली.

राजूला दोन नोकऱ्या करणं केवळ त्याच्या शिस्तीमुळे शक्य झालं आहे. तो सकाळी ६ ते १० या वेळेत बंगळुरूमध्ये डोसा बॅटर विकतो आणि त्यानंतर आपल्या दुसऱ्या नोकरीवर जातो. संदीप यांनी राजूकडून बॅटर खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये राजूचा उल्लेख Legend असा केला आहे. त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत.

Web Title : पिता का समर्पण: बेटी की शिक्षा के लिए 15 साल तक दोहरी शिफ्ट

Web Summary : बैंगलोर के राजू ने अपनी बेटी को शिक्षित करने के लिए 15 साल तक दो नौकरियाँ कीं। वह सुबह डोसा बैटर बेचते हैं और बाद में दूसरी नौकरी करते हैं। सोशल मीडिया पर एक ग्राहक द्वारा उनकी कहानी साझा करने के बाद उनकी मेहनत की सराहना की गई।

Web Title : Father's Dedication: 15 Years of Double Shifts for Daughter's Education

Web Summary : Bangalore's Raju worked two jobs for 15 years to educate his daughter. He sells dosa batter in the morning and works another job later. His dedication inspired many after a customer shared his story on social media, praising his hard work.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.