Viral Photo: भिकारी की मॉडेल? दिल्लीतल्या तरुणाचा फोटो व्हायरल; नेटकरी झाले चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 15:12 IST2022-08-11T15:11:53+5:302022-08-11T15:12:40+5:30
Beggars Look like Model: हा फोटो राजधानी दिल्लीतल्या एखा ट्रॅफिक सिग्लनचा आहे. या सिग्नलवरील तरुणाचा फोटो सध्या व्हायरल होतोय.

Viral Photo: भिकारी की मॉडेल? दिल्लीतल्या तरुणाचा फोटो व्हायरल; नेटकरी झाले चकीत...
Viral Photo:सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील एका चहा विक्रेत्याचा फोटो व्हायरल झाला होता. तो एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नव्हता. याशिवाय, रस्त्यावर फुगे विकणाऱ्या एका भारतीय तरुणीचाही अतिशय सुंदर फोटो व्हायरल झाला होता. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो राजधानी दिल्लीतला आहे.
सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेला फोटो दिल्लीतल्या एका भिकाऱ्याचा आहे. पण, या व्यक्तीचा फोटो पाहून तो भिकारी आहे की, एखादा मॉडेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बुधवारी एका ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन लिहीले की, 'दिल्लीवाला भिकारी.' या फोटोला 17 हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि 1 हजारांपेक्षा जास्त री-ट्वीट्स मिळाले आहेत.
ट्रॅफिक सिग्नलवर काढला फोटो
या फोटोवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहीले, 'हा साउथ दिल्लीला भिकारी असेल.' दुसऱ्याने लिहीले, 'गरीब आणि भिकाऱ्यांचा कबीर सिंग.' काहींना या व्यक्तीत आदित्य रॉय कपूर आणि ऋतिक रोशनची झलक दिसत आहे. हा फोटो दिल्लीतल्या एका ट्रॅफिक सिग्लनचा आहे. या फटोत एक व्यक्ती कुबड्यांच्या सहाय्याने चालताना दिसत आहे. झुपकेदार दाढी, पिळदार मिशा आणि डोळ्यावर काळा चष्मा लावलेला हा व्यक्ती एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाहीये. पण, हा व्यक्ती सिग्लनवर भिक मागत होता की, रस्ता क्रॉस करत होता, याची माहिती मिळू शकली नाही.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर सोनू (@supermodel72) नावाच्या ट्विटर यूजरने हे ट्वीट री-ट्वीट केले आणि लिहीले की, 'तू भिकारी असशील, मी मॉडेल आहे.' सोनूच्या ट्वीटला आतापर्यंत 11 हजार लाइक्स आणि 1200 पेक्षा जास्त रीट्वीट मिळाले आहेत. काहीजण म्हणत आहे की, हे सोनू नावाचे अकाउंट फोटोबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी उघडले आहे.