VIDEO : बाल्ड लूक असलेल्या तरूणीची सोशल मीडियावर रंगली चर्चा, लोक म्हणाले - काय अदा आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 18:48 IST2021-08-18T18:46:24+5:302021-08-18T18:48:32+5:30

इतकंच नाही तर सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोक तिच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Beautiful girl without hair drove a rickshaw people says like this viral video | VIDEO : बाल्ड लूक असलेल्या तरूणीची सोशल मीडियावर रंगली चर्चा, लोक म्हणाले - काय अदा आहे!

VIDEO : बाल्ड लूक असलेल्या तरूणीची सोशल मीडियावर रंगली चर्चा, लोक म्हणाले - काय अदा आहे!

असं म्हणतात की, तरूणींनी टक्कल केलं तर त्या चांगल्या दिसत नाही. पण एका व्हिडीओने हा समज खोटा ठरवला आहे. सोशल मीडियावर गाजत असलेल्या या तरूणीने केस तर शेव्ह केलेच, पण सोबतच ती आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगण्यात विश्वास ठेवते. इतकंच नाही तर सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोक तिच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. पण तिला याने काही फरक पडत नाही. 

सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ही तरूणी तीन चाकी सायकल रिक्षा चालवताना दिसत आहे. बाल्ड लूकमध्ये ही तरूणी फारच सुंदर आणि हॉट दिसत आहे. रिचा खर्ब असं या तरूणीं नाव असून ती व्यवसायाने एक न्यूट्रिशिअन आहे. इतकंच नाही तर ती इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे वेगळे व्हिडीओ शेअर करत असते. 

रिचा खर्चचे इन्स्टाग्रामवर साधारण ७० हजार फॉलोअर्स आहेत. रिचाचे व्हिडीओ पाहिले तर ती स्टायलिश अंदाजात नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. बचपन प्यार गाण्यावरही तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. तिचे व्हिडीओ लाखो लोकांना आवडतात. तिचा हा अंदाज प्रेरणा देणारा आहे.
 

Web Title: Beautiful girl without hair drove a rickshaw people says like this viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.