Video : विमानात वटवाघूळ शिरतं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 17:58 IST2019-08-03T17:47:36+5:302019-08-03T17:58:03+5:30

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. विमानात वटवाघूळ शिरल्याचा असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Bat terrorizes travellers inside a flight, incident captured on camera | Video : विमानात वटवाघूळ शिरतं तेव्हा...

Video : विमानात वटवाघूळ शिरतं तेव्हा...

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. विमानात वटवाघूळ शिरल्याचा असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. विमानाने उड्डाणं घेतलं असता एक वटवाघूळ अचानक विमानात शिरले. वटवाघूळ पाहिल्यानंतर विमानातील प्रवाशांची ही चांगलीच तारांबळ उडाली. जवळपास 30 मिनिटं हे वटवाघूळ विमानात फिरत होतं. 

वटवाघूळ विमानात शिरल्याने प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच काही वेळाने एका प्रवाशाने ते वटवाघूळ पकडले आणि विमानाच्या बाथरूममध्ये ठेवले. सध्या वटवाघळाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

'या' प्रसिद्ध मॉडेलनं केलं कुत्र्याशी लग्न; टीव्हीवर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण!

लग्न म्हटलं की, एक नवरा आणि एक नवरी असते. पण अनेकदा काही लोक वेगळं करण्याच्या नादात असं काही करतात की, पाहणारेच विचारात पडतात. 49 वर्षांची स्विमसूट मॉडेल एलिजाबेथ होडने लग्न केलं आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये नवीन काय? लग्न तर केलं आहे. या लग्नात नवरी तर एलिजाबेथ होती, पण नवरा मात्र एक 6 वर्षांचा कुत्रा होता. बसला ना धक्का... एवढचं नाहीतर हे लग्न जगभरातील लोकांनी पाहिलं कारण, ब्रिटनमधील प्रसिद्ध टिव्ही शो 'द मॉर्निंग'ने हे लग्न लाइव्ह टेलिकास्ट केलं होतं. अनेक प्रेक्षक हे लग्न पाहून हैराण झाले. या लग्नामध्ये नवरा असलेल्या कुत्र्याचे ना लोगन आहे. हा कुत्रा गोल्डन रिट्रिवर प्रजातीचा आहे. या प्रकरणावर लोकांनी ट्विटरवर अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

 

Web Title: Bat terrorizes travellers inside a flight, incident captured on camera