Baby's first haircut : केस कापायला बसला ६ महिन्यांचा चिमुकला; न्हाव्यानं कैची लावताच दिली अशी रिएक्शन, पाहा भन्नाट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:18 IST2021-03-23T14:12:39+5:302021-03-23T14:18:31+5:30
Baby's first haircut Trending Viral Video : या चिमुकल्याच्या केसांना कात्री लावताच त्यानं भन्नाट(Cute Expressions) रिएक्शन दिली आहे. त्याचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं आहे.

Baby's first haircut : केस कापायला बसला ६ महिन्यांचा चिमुकला; न्हाव्यानं कैची लावताच दिली अशी रिएक्शन, पाहा भन्नाट व्हिडीओ
सोशल मीडियावर (Social Media) एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल (Baby Getting His First Haircut) व्हिडीओनं सगळ्यांचेच मन जिंकलं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता न्हाव्यानं या चिमुकल्याच्या केसांना कात्री लावताच त्यानं भन्नाट(Cute Expressions) रिएक्शन दिली आहे. त्याचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं आहे.
This 6 month kid loving his first haircut..
— Buitengebieden (@buitengebieden_) March 20, 2021
Sound on 😊 pic.twitter.com/ZHMhwZ5SNn
व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की आईने मुलाला धरलं आहे. मूल केस कापण्याचा आनंद घेत हसताना दिसत आहे. न्हावी केसांवर कात्री लावताच चिमुकल्याचे मोठ्याने हसणे सुरू होते. अनेकदा सलूनमध्ये जायचं म्हटलं की मुलं मुलांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही. पण इथे मात्र हा मुलगा खूपच आनंदात दिसून येत आहे. त्याच्या हसण्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे की, '६ महिन्यांचे बाळ जेव्हा केस कापण्याचा आनंद घेतं.' हा व्हिडिओ 20 मार्च रोजी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ५० हजाराहून अधिक व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच ३ हजाराहून अधिक लाईक्स आणि ३०० हून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ री-ट्वीट केला आहेत. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
My baby Anushrut,
— Anup Jiwan Petkar (@Anup20992699) November 22, 2020
Every Parents is struggle pic.twitter.com/wN7B510ZwS
याआधीही असाच एका नागपूरच्या मुलाचा केस कापतानचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. न्हावी जसजसे केस कापत आहे. तसतसा हा चिमुरडा 'अरे यार.... बाल मत काटो' असं म्हणत त्याला थांबवतो. हा न्हावी केस कापत असताना या चिमुरड्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. पण प्रश्नांची उत्तर दिल्यानंतरही हा चिमुरडा रागात असतो. त्यानंतर न्हाव्याला प्रेमळ धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया युजर्स या मुलाच्या क्यूटनेसचे चाहते झाले होते.