VIDEO : माकडाने घेतली ड्रॅगन फ्रूटची टेस्ट, बघा कॅमेरासमोर कशी दिली त्याने प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:08 IST2022-04-11T15:06:44+5:302022-04-11T15:08:29+5:30
Monkey Viral Video : हा व्हिडीओ जंगलात कुठेतरी रेकॉर्ड करण्यात आला आहे. माकड जमिनीवर बसलं असून व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने माकडाला ड्रॅगन फ्रूट देण्यासाठी ते कापलं.

VIDEO : माकडाने घेतली ड्रॅगन फ्रूटची टेस्ट, बघा कॅमेरासमोर कशी दिली त्याने प्रतिक्रिया!
Monkey Viral Video : प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी हत्तीचे तर कधी मांजरींचे तर कधी सापांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी कधी हे व्हिडीओ हैराण करणारे तर कधी चेहऱ्यावर हसू आणणारे असतात. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एक छोटसं माकड ड्रॅगन फ्रूट खाताना दिसत आहे.
हा व्हिडीओ जंगलात कुठेतरी रेकॉर्ड करण्यात आला आहे. माकड जमिनीवर बसलं असून व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने माकडाला ड्रॅगन फ्रूट देण्यासाठी ते कापलं. तेव्हा माकड त्याचा अंगठा तोंडात घालून बघत असतो. मोठ्या आश्चर्याने माकड त्या फळाकडे बघतं. कारण ते त्याने याआधी कधी खाल्लेलं नसतं.
ती व्यक्ती ड्रॅगन फ्रूटचा एक तुकडा माकडाला खाण्यासाठी देतो. माकडे तो तुकडा लगेच खात नाही. माकडाला विश्वास देण्यासाठी ही व्यक्ती स्वत: एक तुकडा आधी खातो. नंतर माकडानेही फळाचा एक तुकडा टेस्ट केला. माकडाचे त्यानंतर एक्सप्रेशन पाहून यूजर्स मजेदार कमेंट्स करत आहेत.
सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. lovinganimals.dg नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. लोक व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत आणि लाइक्सही करत आहेत.