"मला धूसर दिसतंय..."; वृंदावनच्या होळीत परदेशी महिलेच्या डोळ्यात फेकला दगडमिश्रित रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:47 IST2026-03-04T11:46:22+5:302026-03-04T11:47:21+5:30

Video - ब्रिटा श्लागबाउर हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून आपला हा अनुभव सांगितला आहे.

austrian woman shares her horrible experience of vrindavan holi says my vision is still blurry watch viral video | "मला धूसर दिसतंय..."; वृंदावनच्या होळीत परदेशी महिलेच्या डोळ्यात फेकला दगडमिश्रित रंग

"मला धूसर दिसतंय..."; वृंदावनच्या होळीत परदेशी महिलेच्या डोळ्यात फेकला दगडमिश्रित रंग

दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक वृंदावनच्या होळीचा आनंद घेतात. येथील मंदिरांमधील उत्सव आणि रंगांची उधळण जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र यंदा एका ऑस्ट्रियन महिलेसाठी हा अनुभव अत्यंत वेदनदायी ठरला. होळी खेळताना कुणीतरी तिच्या डोळ्यात दगडमिश्रित रंग फेकला, ज्यामुळे तिला धूसर दिसत असल्याचा दावा तिने केला आहे.

ऑस्ट्रियाची रहिवासी असलेल्या ब्रिटा श्लागबाउर (Britta Schlagbauer) हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून आपला हा अनुभव सांगितला आहे. तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "वृंदावनमधील होळीचा अनुभव - एका शब्दात सांगायचा तर 'क्रेझी'!"

व्हिडिओमध्ये ब्रिटाने सांगितलं की, तिच्या दिवसाची सुरुवात मित्र-मैत्रिणी, रंग आणि उत्साहाने झाली होती. तिने स्कार्फ खरेदी केला, रंग लावलेल्या गायी पाहिल्या, चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि अनेक सुंदर मंदिरांत जाऊन दर्शन घेतलं. यावेळी ती 'भांग' देखील प्यायली. तिच्या मते सुरुवातीला वातावरण खूपच सुंदर होतं, पण अचानक सर्व काही बदललं.


डोळ्यात गेला दगडमिश्रित रंग

ब्रिटाच्या सांगण्यानुसार, रस्त्यावर दर काही सेकंदाला लोक एकमेकांवर रंग फेकत होते. याच दरम्यान एका व्यक्तीने जमिनीवर पडलेला रंग उचलला, ज्यामध्ये छोटे छोटे दगड मिसळलेले होते. तो रंग थेट तिच्या डोळ्यात गेला. ती म्हणाली, "डोळ्यांची भयंकर जळजळ होऊ लागली. मी रडू लागले, डोळे पाण्याने धुतले, पण मला अजूनही धूसर दिसत आहे."

या वेदनादायक अनुभवानंतरही तिने होळीला 'मॅजिकल' असं म्हटलं आहे. मात्र, तिने एक इशाराही दिला की, एका महिलेसाठी आणि विशेषतः परदेशी महिलेसाठी हा अनुभव नेहमीच सोपा नसतो. काही लोकांनी हे कृत्य अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ब्रिटाचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सनी पर्यटकांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी रस्त्यांवर होळी खेळणं टाळावं. काही लोकांनी सुचवलं की, वृंदावनमधील श्री राधा रमणजी मंदिर आणि राधा वल्लभजी मंदिर यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये होळी खेळणं अधिक सुरक्षित आहे. अनेकांनी होळी खेळताना स्वत:ची नीट काळजी घ्या, सतर्क राहा असा सल्ला दिला आहे. 
 

Web Title : वृंदावन में होली के दौरान विदेशी महिला घायल; पत्थर मिश्रित रंग फेंका गया।

Web Summary : वृंदावन में होली मना रही एक ऑस्ट्रियाई महिला, ब्रिट्टा श्लागबाउर ने शिकायत की कि किसी ने उनकी आंखों में पत्थर मिश्रित रंग फेंक दिया, जिसके बाद उन्हें धुंधला दिखाई देने लगा। दर्दनाक अनुभव के बावजूद, उन्होंने होली को जादुई बताया, लेकिन चेतावनी दी कि यह महिलाओं, खासकर विदेशियों के लिए हमेशा आसान नहीं होता है। इस घटना ने होली समारोहों के दौरान सुरक्षा को लेकर सोशल मीडिया पर बहस छेड़ दी।

Web Title : Foreign woman injured during Holi celebrations in Vrindavan; stone-mixed color thrown.

Web Summary : An Austrian woman, Britta Schlagbauer, celebrating Holi in Vrindavan, reported blurred vision after someone threw stone-mixed color in her eyes. Despite the painful experience, she described Holi as magical but cautioned it's not always easy for women, especially foreigners. The incident sparked debate on social media about safety during Holi celebrations.