भुकेल्या हत्तीनं झाडाझुडपातून धावत येत पर्यटकांची गाडी अडवली, अन्...; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर शराहा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:39 IST2023-12-21T13:38:21+5:302023-12-21T13:39:25+5:30

पर्यटकांच्या गाडीवर हत्तीच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

angry elephant smashes touriest car window in search of food sri lanka video goes vural on social media | भुकेल्या हत्तीनं झाडाझुडपातून धावत येत पर्यटकांची गाडी अडवली, अन्...; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर शराहा येईल

भुकेल्या हत्तीनं झाडाझुडपातून धावत येत पर्यटकांची गाडी अडवली, अन्...; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर शराहा येईल

Viral Video : हत्ती हा जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या ताकदीपुढे इतर कोणाचेही चालत नाही. मुळात हत्ती हा शांत स्वभावाचा प्राणी आहे. पण जेव्हा हत्तीला राग येतो तेव्हा समोरच्याची काही खैर नाही.  वाटेत जे काही येईल त्याला तो मुळासकट उपटून काढतो. अशाच एका हत्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. पर्यटकांच्या गाडीवर हा हत्ती हल्ला करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, घटनेदरम्यान कारमधील पर्यटक भयभीत झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

बिबट्या, वाघ यांसारख्या जंगली प्राण्यांनी मानवी वस्तीत शिरून प्राणघातक हल्ले केल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. यातच आता हत्तीच्या हल्ल्याचा व्हिडीओन पाहून नेटकऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीचा रस्ता या हत्तीने अडवल्याचे व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. शिवाय गाडीच्या काचेमधून आत सोंड घालत हा हत्ती गाडी पुढे जाऊ देत नाही. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, हा व्हिडीओ श्रीलंकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटक जंगल सफारी करताना त्यांची गाडी जंगलाच्या मध्यवर्ती ठिकाणी पोहचते. त्या क्षणी जंगलातून एक हत्ती धावत येतो आणि त्यांची गाडी आडवतो. हा हत्ती गाडीमध्ये आपली सोंड टाकतो. कदाचित अधिक भुक लागल्याने हत्तीने पर्यटकांची गाडी अडवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये गाडीच्या काचेसह काही सामानाची देखील या हत्तीने नासधूस केल्याचे बघायला मिळत आहे. सुदैवाने या हल्ल्यात गाडीमधील लोक थोडक्यात बचावले. अखेर या पर्यटकाने हत्तीच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. संधी मिळताच त्याने गाडी पळवली.

येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: angry elephant smashes touriest car window in search of food sri lanka video goes vural on social media