शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तुझ्या जिद्दीला सलाम! ना हात ना पाय पण जुगाडू बाईक चालवत करतो आपल्या कुटुंबाचा गुजराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 19:54 IST

अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे ती एका दिव्यांग व्यक्तीने. ज्याला दोन्ही हात नाही आणि दोन्ही पाय नाहीत (Man without leg hand drive bike). पण तरी त्याने रस्त्यावर सुसाट बाईक पळवली आहे.

ड्रायव्हिंग (Driving video) करायचं म्हटलं की हात आणि पाय दोन्ही लागतात. जर हातपाय नसतील तर ड्रायव्हिंग करणं कठीणचं. त्यातही बाईक चालवायची असेल तर शक्यच नाही (Disable man drive bike). कारण त्यावेळी बॅलेन्स खूप महत्त्वाचा असतो जो हातापायांनी ठेवावा लागतो. पण आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे ती एका दिव्यांग व्यक्तीने. ज्याला दोन्ही हात नाही आणि दोन्ही पाय नाहीत (Man without leg hand drive bike). पण तरी त्याने रस्त्यावर सुसाट बाईक पळवली आहे.

आपल्या हातापायाला तात्पुरती दुखापत झाली तरी आपल्याला साधं उठणं, बसणंही कठीण वाटतं. अशात मेहनत करणं तर दूरचीच गोष्ट. काही अपंग व्यक्ती स्वतःला कमजोर समजून लोकांसमोर मदतीसाठी हात पसरतानाही दिसतात. पण अशाच अपंग व्यक्तींसाठी किंबहुना धडधाकट असलेल्या प्रत्येकासाठी ही दिव्यांग व्यक्ती प्रेरणा देणारी ठरली आहे. दिव्यांग व्यक्तीला ड्रायव्हिंग करताना पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही थक्क झाले आहेत.  या व्यक्तीची हिंमत, जिद्द, मेहनत पाहून त्याला तुम्हीही सलाम कराल.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ही व्यक्ती हातपाय नसतानाही मोरिफाइड गाडी चालवताना दिसते आहे. व्हिडीओत ही व्यक्ती सांगते, माझी पत्नी दोन लहान मुलं आणि वयस्कर वडील राहतात. त्यामुळे काही कमावण्यासाठी म्हणून मी घराबाहेर पडतो. गेल्या पाच वर्षांपासून ही गाडी चालवतो.  त्याच्या या मोडिफाइड गाडीत स्कुटीचं इंजिन आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत ट्वीटमध्ये म्हटलं आहे, आज मला हे माझ्या टाइमलाइनवर सापडलं. हा व्हिडीओ किती जुना आहे, कुठला आहे हे मला माहिती नाही. पण या व्यक्तीला पाहून मी थक्क झालो आङे. ज्याने फक्त आपल्यातील उणीवांचा सामना केला नाही तर त्याच्याकडे जे काही आहे, त्यात समाधान मानलं.

राम, @Mahindralog_MLL त्यांना लास्ट माइल डिलीव्हरीचं बिझनेस असोसिएट बनवू शकतात का?, असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीला जॉबही ऑफर केला आहे. आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की त्याने या व्यक्तीला दक्षिण दिल्लीतील महरौली परिसराच्या आसपास पाहिलं होतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAnand Mahindraआनंद महिंद्राSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर