बाईकवर सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यासाठी पठ्ठ्यानं केला भन्नाट जुगाड; आनंद महिंद्रा म्हणाले की.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 16:46 IST2021-04-30T16:40:27+5:302021-04-30T16:46:41+5:30

Anand mahindra post hilarious photo : काही सोशल डिस्टेंसिंग टेक्निक्स  सुरक्षेपेक्षा जास्त जोखिमेच्या वाटू शकतात. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Anand mahindra post hilarious photo of two bikers transporting a ladder by placing it around their necks | बाईकवर सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यासाठी पठ्ठ्यानं केला भन्नाट जुगाड; आनंद महिंद्रा म्हणाले की.....

बाईकवर सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यासाठी पठ्ठ्यानं केला भन्नाट जुगाड; आनंद महिंद्रा म्हणाले की.....

सोशल मीडियावर बाईकवरून शिडी घेऊन  (Two Bikers Transporting A Ladder)  जात असलेल्या चालकांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही खूप हसायला येईल. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोक सोशल डिस्टेंसिंगच्या वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत आहेत. पण या फोटोत व्हायरल होणारी टेक्निक तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.

शीडी  घेऊन जाण्यासाठी दोन लोकांनी वेगवेगळ्या बाईक्स चालवल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनी  ही पोस्ट शेअर करत असताना गमतीदार रिएक्शन दिली आहे. या व्हायरल फोटोत असे दिसून येते की दोन दुचाकीस्वार  शिडी घेऊन मजेशीर बाईकवर जात होते. त्यांच्या गळ्यात एक शिडी होती. हा नवीन फोटो नाही. तरीही इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

आनंद महिंद्रांनी पुन्हा मजेदार प्रतिक्रियेसह हा फोटो पोस्ट केला आहे. आनंद महिंद्रांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हे चित्र पाहून या कठीण काळातही मला हसू आवरता आलं नाही. काही सोशल डिस्टेंसिंग टेक्निक्स  सुरक्षेपेक्षा जास्त जोखिमेच्या वाटू शकतात.' आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

Web Title: Anand mahindra post hilarious photo of two bikers transporting a ladder by placing it around their necks