'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 02:06 PM2023-01-04T14:06:16+5:302023-01-04T14:06:58+5:30

आनंद महिंद्रांनी न्यू इअर रिझोल्यूशन असलेले एक मीम शेअर केला आहे.

Anand Mahindra : Netizens' funny comments on Anand Mahindra's tweet, 'You are like us...' | 'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

Next

Anand Mahindra: नववर्षाच्या सुरुवातीला अनेकजण विविध प्रकारचे संकल्प करतात. यातील एक कॉमन संकल्प म्हणजे सकाळी लवकर उठून व्यायाम सुरू करणे. डिसेंबरमध्ये अनेकजण ठरवतात की, 1 जानेवारीपासून जिम, योगा, धावणे किंवा इतर कोणताही शारीरिक व्यायम सुरू करायचा. पहिल्या एक-दोन दिवस हा संकल्प जोमाने करतात, पण नंतर कोणी करत नाही. महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही ट्विटरवर अशा एक संकल्पाचा मीम शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात, अनेक मुद्द्यांवर ते आपले मत मांडतात. नवीन वर्षाच्या संकल्पासंदर्भात त्यांनी शेअर केलेले मीम तुम्ही पाहू शकता. या मीममध्ये एक व्यक्ती 1 तारखेपासून व्यायामाला सुरुवात करते आणि 4 तारखेपर्यंत थकून झोपी जाते. हा मीम शेअर करताना महिंद्रांने लिहिले की, "नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याच्या असा अनुभव येतो..." त्यांच्या ट्विटला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

लोकांच्या मजेशीर कमेंट्स
या ट्विटला 68000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. महिंद्रांच्या या ट्विटवर लोकांनी खूप मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिले, "कमालीचे सेंस ऑफ ह्यूमर. मीही तुमच्या क्लबमध्ये सामील झालोय सर." दुसऱ्याने लिहिले, ''व्यायामाला मजा म्हणून पाहिले पाहिजे, शिक्षा म्हणून नाही.'' आणखी एकाने लिहिले, ''तुम्हीही आमच्यासारखेच आहात..."

महिंद्रांचे पहिले ट्विट
आनंद महिंद्रा यांनी या वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ते सहसा नववर्षाचा संकल्प करत नाहीत. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एक महिला खडूने बोर्डवर चित्र काढत होती. हा व्हिडिओ शेअर करताना महिंद्राने पुढे लिहिले की, नवीन वर्षात चढ-उतार येतील, पण मला आशा आहे की त्या नकारात्मक गोष्टींचा वापर मी स्वतःमध्ये अधिक सकारात्मक बदल करण्यासाठी करेन. मी वाईट काळाचा उपयोग मजबूत होण्यासाठी करेन आणि माझ्या हृदयात इतरांबद्दल अधिक सहानुभूती ठेवेन.

Web Title: Anand Mahindra : Netizens' funny comments on Anand Mahindra's tweet, 'You are like us...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.