खतरनाक! 'बाइक आहे की यमराजाची सवारी...?', व्हिडीओ बघून लोक झाले अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:23 IST2024-05-03T13:22:14+5:302024-05-03T13:23:05+5:30
Bike Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक अजब बाइक बघायला मिळते. या व्यक्तीने प्रेडिटर थीमवर बाइक बनवली आहे.

खतरनाक! 'बाइक आहे की यमराजाची सवारी...?', व्हिडीओ बघून लोक झाले अवाक्...
Bike Viral Video : बाइकचे शौकीन लोक सगळीकडेच असतात. कुणी महागड्या स्पोर्ट्स बाइक चालवतात तर कुणी जुन्या गाड्या मॉडिफाय करतात. काही लोकांना रेसिंगच्या बाइक आवडतात. पण काही असेही लोक असतात ज्यांना वेगळ्या बाइक आवडतात. ते बाइक वेगळ्या पद्धतीने डिझाइन करून घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक अजब बाइक बघायला मिळते. या व्यक्तीने प्रेडिटर थीमवर बाइक बनवली आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बाइकच्या मागे एक लांबलचक शेपटी दिसत आहे. हळूहळू बाइक समोर जात आहे जेव्हा बाइकचा समोरचा भाग दिसतो तेव्हा वाटतं एक व्यक्ती एखाद्या खतरनाक प्राण्यावर सवारी करत आहे. पाय ठेवायची जागेवर प्राण्याच्या पायाचं डिझाइन केलं आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम यूजर @tech.nologyfacts2025 ने शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत कोट्यावधी व्ह्यूज मिळाले आहेत. तेच 6 लाख 26 हजारांपेपेक्षा जास्त लाइक्स आणि शेकडोंनी शेअर केला आहे. तर 1200 पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.
व्हिडीओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिलं की, 'भाऊ तर एनाकोंडा घेऊन फिरत आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं की, ही यमदूताची गाडी वाटत आहे. तिसऱ्याने लिहिलं की, या गाडीवर तर आरामात 5 ते 6 लोक बसू शकतील. एकाने लिहिलं की, RTO वाले या व्यक्तीचा शोध घेत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.