शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

फूट ओव्हर ब्रिजखाली अडकलं Air India चं विमान; Social Media वर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:55 IST

Air India Viral video : सध्या एअर इंडियाच्या विमानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ठळक मुद्देसध्या एअर इंडियाच्या विमानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. रविवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये दिल्ली विमानतळाच्या बाहेर दिल्ली-गुरुग्राम हायवेवर असलेल्या एका फूट ओव्हर ब्रीजच्या खाली एअर इंडियाचं एक विमान अडकलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते विमान त्या ठिकाणी कसं पोहोचलं हा प्रश्नही पडला.

खरं तर या विमानाचा अपघात झालेला नाही. परंतु हे विमान खराब झालेलं आहे. जे विमान एअर इंडियानं (Air India) विकून टाकलं आहे. तसंच हे विमान ज्यानं खरेदी केलं, त्या मालकाद्वारे नेण्यात येत होतं. "हे एक जुनं विमान आहे आणि ते खराब झालं होतं. त्याची आम्ही पूर्वीच विक्री केली होती. याबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती नाही, कारण ज्याला याची विक्री केली होती तोच हे विमान घेऊन जात होता," अशी प्रतिक्रिया एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं दिल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे.  जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये गाड्या हायवेच्या एका बाजूनं जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे विमान अडकल्यामुळे ट्रॅफिक पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाल्याचंही दिसत आहे. विमानाचा पुढचा आणि मधला भाग फूट ओव्हर ब्रीजच्या खालून पुढे गेला परंतु मागील भाग ब्रीजखाली अडकल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, हे कंपनीच्या ताफ्यात असलेल्या विमानांशी संबंधित विमान नाही. या व्हिडीओमध्ये विमान विना विंग्सचं नेलं जात आहे. हे नेण्यात ड्रायव्हरची चूक असून त्यामुळेच ते अडकलं आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली विमानतळाच्या एका अधिकाऱ्यानं दिली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAir Indiaएअर इंडिया