Agnipath scheme protest: पोलीस अधिकाऱ्याचा 'मास्टरस्ट्रोक'! आंदोलकांसमोर रस्त्याच्या मधोमध माईक घेऊन बसला आणि म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:47 IST2022-06-17T16:44:29+5:302022-06-17T16:47:30+5:30
आंदोलकांना शांत करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल; पाहा Video

Agnipath scheme protest: पोलीस अधिकाऱ्याचा 'मास्टरस्ट्रोक'! आंदोलकांसमोर रस्त्याच्या मधोमध माईक घेऊन बसला आणि म्हणाला...
Agnipath scheme protest against modi government: अग्निपथ योजना घोषित केल्यापासून केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. या योजनेची घोषणा केल्यापासूनच उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसह इतर राज्यांतही या योजनेविरोधात निदर्शने केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून अनेक ट्रेन्स पेटवून देण्यात आल्या आहेत. सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अमेठी मध्ये एसपी दिनेश कुमार यांना निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना अनोख्या प्रकारे शांत करण्याचा प्रयत्न केल्याचा या व्हिडीओत दिसत आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एसपी दिनेश कुमार सिंह रस्त्याच्या मधोमध बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात माईक आहे. त्यांच्या पाठीमागे पोलिस दलातील कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तसेच आजूबाजूला अग्निपथ योजनेचा विरोध करत असणारे आंदोलक आहेत. या साऱ्या गडबड गोंधळात एसपी दिनेश सिंह सगळ्यांना शांत होण्याचे आणि खाली बसण्याचे आवाहन करताना दिसतात. मात्र जमाव शांत होत नसल्याचे दिसत असल्यामुळे ते माईकवरून 'भारत माता की जय' अशा जोरजोरात घोषणा देण्यास सुरूवात करतात. यात आश्चर्य म्हणजे, आंदोलक देखील यांच्या सूरात सूर मिसळून भारता माता की जय म्हणत घोषणा देताना दिसतात. पाहा VIDEO-
एसपी अमेठी दिनेश कुमार सिंह ने अग्निपथ योजना के विरोध में प्रदर्शन करने आए छात्रों से लगवाए "भारत माता की जय" के नारे pic.twitter.com/KTaaWXb8dW
— आदित्य तिवारी / Aditya Tiwari (@aditytiwarilive) June 17, 2022
आंदोलनकर्त्यांना अशा अनोख्या पद्धतीने नियंत्रणात आणणाऱ्या एसपी दिनेश सिंह यांचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक केले जात आहे. हा व्हिडीओ काही लोकांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सने चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, हा पोलिस कर्मचारी जमावाला नियंत्रणात आणण्याच्या कलेतील मास्टरब्लास्टर आहेत. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, 'धन्यवाद साहेब तुम्ही तुमच्या सद्सदविवेक बुद्धीने या जमावाला शांत केलंत हे चांगलंच आहे. पण पंतप्रधान मोदींना कोण समजवणार.