क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली इमारत, कारण; शेजाऱ्याची 'ही' छोटीशी चूक, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 06:10 PM2021-09-19T18:10:54+5:302021-09-19T18:11:51+5:30

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेलच पण तुम्हाला यातून एक धडाही मिळेल. एका तीन मजली इमारतीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये काहीतरी खोदकाम चाललं आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडते...

accident because of construction work, three storey building collapsed viral video | क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली इमारत, कारण; शेजाऱ्याची 'ही' छोटीशी चूक, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली इमारत, कारण; शेजाऱ्याची 'ही' छोटीशी चूक, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

Next

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ नेहमीच काही विनोदी किंवा थरारक नसतात. अनेकदा इथे अशा काही गोष्टी व्हायरल होतात ज्या तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेलच पण तुम्हाला यातून एक धडाही मिळेल. एका तीन मजली इमारतीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये काहीतरी खोदकाम चाललं आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडते...

व्हिडिओमध्ये दिसतं, की एका इमारतीच्या शेजारीच एक रिकामा प्लॉट आहे. याठिकाणी बांधकाम सुरु असल्याने जमिन खोदण्याचे काम होत आहे. या खोदकामामुळे या बाजुच्या इमारतीला हादरे बसत आहेत.हे सर्व सुरु असतानाच डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच तीन मजली इमारच पत्त्यासारखी कोसळते.

इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या एका यूजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, की जर तुमच्या दुकानाच्या आसपास खाली प्लॉट असेल आणि त्यात खोदकाम सुरू असेल तर त्याला विरोध करणं आहे ते काम थांबवणं हा तुमचा हक्क आहे. यामुळे तुमच्या प्रॉपर्टीचं मोठं नुकसान होऊ शकतं. हा व्हिडिओ आतापर्यंत २० हजारहून अधिकांनी पाहिला आहे. 

Web Title: accident because of construction work, three storey building collapsed viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app