Video : मेहंदीने साकारलेला भन्नाट ब्लाऊज, महिलेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 16:08 IST2021-11-30T16:00:20+5:302021-11-30T16:08:41+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एका महिलेच्या अंगावर केवळ मेहंदीने साकारलेला ब्लाऊज आहे. 

Abandoned blouse made by Mehndi, woman's video goes viral social media | Video : मेहंदीने साकारलेला भन्नाट ब्लाऊज, महिलेचा व्हिडिओ व्हायरल

Video : मेहंदीने साकारलेला भन्नाट ब्लाऊज, महिलेचा व्हिडिओ व्हायरल

ठळक मुद्देदरम्यान, Thanos_Jatt या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

नवी दिल्ली - शृंगार हा महिलाचा दागिना असतो, महिलांचं सौंदर्य खुलविण्यासाठी अनेकानेक सौंदर्य प्रसाधनांचं वापरही त्यांच्याकडून केला जातो. त्यात, फॅशनेबल ट्रेंडच्या माध्यमातूनही त्या आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच, फॅशनेबल कपडे किंवा साड्यांच्या खरेदीवरही महिलांचा भर असतो. सध्या, सोशल मीडियावर एका महिलेचा फॅशनेबल ब्लाऊज चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या महिलेनं केवळ अंगावर महेंदीच्या कोनातून ब्लाऊसच चित्रच रेखाटलं आहे. 

भारतीय महिलांचा पारंपरीक पोशाख म्हणजे साडी होय. प्रादेशिक प्रांतवार रचनेनुसार या साडीचा पेहराव, डिझाईन बदलत जाते. मात्र, भारतीय नारी ही साडीतच दिसते लय भारी.. असे म्हटलं जातं. त्यामुळे, सहावारी, नऊवारी यासंह अनेक फॅशनेबल साड्या महिला वापरतात. त्यावर, काटपदर ब्लाऊज, मॅचिंग ब्लाऊजचीही खेरदी होत असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एका महिलेच्या अंगावर केवळ मेहंदीने साकारलेला ब्लाऊज आहे. 


या महिलेने पांढऱ्या रंगाची साडी घातली असून त्यावर महेंदीच्या कलरने ब्लाऊज साकारला आहे. विशेष म्हणजे तिने कापडी ब्लाऊज न घालता, मेहंदीने ब्लाऊजचे चित्रच साकारले आहे. तिच्या शरीरावर तिने मेहंदीने मस्त डिझाईन केले आहे. त्यामुळे, हा मेहंदी ब्लाऊज चांगलाच चर्चेत असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

दरम्यान, Thanos_Jatt या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 
 

Web Title: Abandoned blouse made by Mehndi, woman's video goes viral social media