Tracker to Boyfriend's Car: तरुणीने बॉयफ्रेंडच्या गाडीला लावला ट्रॅकर; स्ट्रिप क्लबमध्ये सापडला, मागोमाग ती पण पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:56 IST2022-04-04T15:41:00+5:302022-04-04T15:56:36+5:30
Relationship, Tracker to Boyfriend's Car: प्रियकराचा बदला घेण्याचा अजब प्रकार ऐकून सोशल मीडियावर सगळेच थक्क झाले.

Tracker to Boyfriend's Car: तरुणीने बॉयफ्रेंडच्या गाडीला लावला ट्रॅकर; स्ट्रिप क्लबमध्ये सापडला, मागोमाग ती पण पोहोचली
पुण्याच्या महिलेने पतीचा रंगेलपणा पकडण्यासाठी तिच्या कारला ट्रॅकर लावल्याची घटना खुप गाजलेली. अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. या तरुणीचा बॉयफ्रेंड तिला फसवत होता. त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी तरुणीने त्याच्या कारला ट्रॅकर लावला होता. तो मौजमज्जा करण्यासाठी क्लबमध्ये गेला होता. तिथे तिने त्याला असा काही धडा शिकवला की तो पुन्हा त्या क्लबमध्ये जाण्याचे धाडस करणार नाही.
ट्रॅकरमुळे बॉयफ्रेंड स्ट्रीप क्लबमध्ये गेल्याचे तरुणीला समजले. ती त्याच्या मागोमाग तिथे पोहोचली. मिसी पीटरसन (Missy Peterson) या तरुणीने हा प्रकार टिकटॉकवर शेअर केला आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार मिसीला तिच्या बॉयफ्रेंडने खोटे सांगितले आणि चुकीची लोकेशन शेअर केली. मिसीला तो कुठे आहे ते समजले होते. तो एका स्ट्रिप क्लबमध्ये होता. मिसी त्याच्या समोर अशीतशी गेली नाही, तर त्याच्या समोरच ती क्लबच्या स्टेजवर होती.
मी त्या क्लबमध्ये डान्स करणाऱ्या तरुणींना भेटले आणि खरी गोष्ट सांगितली. त्यांनी मला त्यांच्यासोबत घेण्यास तयारी दाखविली. यामुळे मी त्यांच्यासोबत डान्सर म्हणून स्टेजवर गेली. तिथे खाली माझा बॉयफ्रेंड बसला होता. मला अचानक स्टेजवर पाहून तो हैराण झाला. मिसीने त्याला तिथूनच मोठ्या आवाजात म्हटले, तुला शो पहायचा होता, चल मी दाखवते तुला शो...
मिसीच्या या व्हिडीओला ३९ लाख व्यूव्ज मिळाले आहेत. तसेच पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हजारोंनी तो शेअर केला आहे. प्रियकराचा बदला घेण्याचा अजब प्रकार ऐकून सोशल मीडियावर सगळेच थक्क झाले. अनेक महिलांनी मिसीला पाठिंबा दिला आणि अशा व्यक्तीशी संबंध तोडल्याबद्दल तिचे कौतुक केले. तरी काही लोक मिसीच्या या गोष्टीवर शंका घेत आहेत. अशा क्लबमध्ये नर्तकांचा विमा उतरवला जात असतो, तसेच त्यांची कसून तपासणी होते. यामुळे स्टेजवर जाणं कुणालाही इतकं सोपं नसतं, असे त्यांचे म्हणणे आहे.