विमानात चांगले सीट न मिळाल्याने चक्क लगेज कंपार्टमेंटमध्ये झोपली महिला; व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:03 IST2024-05-10T16:02:20+5:302024-05-10T16:03:17+5:30
Trending News: हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विमानात चांगले सीट न मिळाल्याने चक्क लगेज कंपार्टमेंटमध्ये झोपली महिला; व्हिडिओ व्हायरल...
Trending AirPlane Video: ट्रेनमध्ये अनेकदा गर्दी असल्यामुळे प्रवासी वर सामान ठेवण्याच्या जागेवर जाऊन बसतात किंवा झोपतात. पण, तुम्ही कधी विमानात सामान ठेवण्याच्या जागेवर प्रवासी झापलेला पाहिला आहे का? तुमचा विश्वास बसणार नाही, पण अशा प्रकारची विचित्र घटना प्रत्यक्षात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ साउथवेस्ट एअरलाइन्सच्या फ्लाइटमधील आहे. हे विमान 6 मे रोजी अल्बुकर्क, मेक्सिको येथून फिनिक्स, अमेरिकेला जात होते. विमानातील इकॉनॉमी क्लासमध्ये बसायला पुरेशी जागा नसल्यामुळे महिल्ला चक्क सामान ठेवण्याच्या कप्प्यात जाऊन बसली. व्हायरल व्हिडिओमध्ये मागून लोकांच्या हसण्याचा आवाजही ऐकू येतो. दरम्यान, या महिला तिथे कशी चढली आणि तिला इतर प्रवाशांनी का रोखले नाही, हे अजून तरी समजले नाही.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला किंवा विमान कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. न्यूयॉर्क पोस्टने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला, त्यानंतर तो झटपट व्हायरल झाला आणि जवळपास 50 हजार वेळा पाहिला गेला आहे.