प्रसिद्धीसाठी कायपण! समोरून ट्रेन असताना तो रुळावर झोपला अन् रील बनवण्याच्या नादात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:01 IST2023-07-04T13:01:32+5:302023-07-04T13:01:51+5:30

सोशल मीडियावर सध्या रील्सचा पूर आल्याचे चित्र आहे.

A video is going viral on social media in which a young man is lying down on the track while a train is passing by and making a reel | प्रसिद्धीसाठी कायपण! समोरून ट्रेन असताना तो रुळावर झोपला अन् रील बनवण्याच्या नादात...

प्रसिद्धीसाठी कायपण! समोरून ट्रेन असताना तो रुळावर झोपला अन् रील बनवण्याच्या नादात...

हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. अनेक तरूण-तरूणी भन्नाट व्हिडीओ बनवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. आजच्या घडीला युवा वर्गात रील्स बनवण्याची क्रेझ वाढली आहे. व्ह्यूज मिळवण्यासाठी अनोख्या गोष्टी केल्या जातात. कधी कधी व्ह्यूजच्या नादात ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरूण रेल्वे रुळाखाली झोपून रील बनवताना दिसत आहे. या तरूणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर सध्या रील्सचा पूर आल्याचे चित्र आहे. अगदी लहानग्यांपासून तरूण वर्गात रील्सची क्रेझ आहे. आपली क्रिएटीव्हीटी लोकांपर्यंत पोहोचावी आणि आपले फॉलोअर्स वाढावेत, असा या रील्स बनवणाऱ्यांचा हेतू असतो. रेल्वे रूळाखाली झोपून रील करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधत आहे. संबंधित तरूण रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्याने दोन्ही हात डोक्याखाली ठेवले असून रूळावरून ट्रेन भरधाव वेगाने जात आहे. संबंधित तरूण जीव मुठीत घेऊन रील बनवत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 


 
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण नेटकऱ्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे. काही लोक लाईक्स अन् व्ह्यूजच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याचे नेटकरी म्हणत आहे. 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: A video is going viral on social media in which a young man is lying down on the track while a train is passing by and making a reel