काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:55 IST2025-11-17T13:54:59+5:302025-11-17T13:55:31+5:30
सिंगापूरमध्ये एक ९१ वर्षीय वृद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते वयस्कर आजोबा या वयातही १२ तास शौचालय साफ करण्याचे काम करतात. एका ऑस्ट्रेलियन प्रवाशाने त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
आपल्याकडे ५०–५५ वर्षांचे वय झाले की आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे काम करण्यात अडचणी निर्माण होतात. सध्याचे बदललेले खाणे-पिणे आणि जीवनशैली याचा शरीरावर मोठा परिणाम होत आहे. पण, सध्या एका ९१ वर्षीय व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही की ते खरोखर ९१ वर्षांचे आहेत. एवढ्या वयातही हे आजोबा दररोज सिंगापूरमधील विमानतळावर तब्बल १२ तास काम करतात. ते शौचालय साफ करण्याचे काम करतात. हा व्हिडीओ एका ऑस्ट्रेलियन प्रवाशाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
ऑस्ट्रेलिय प्रवाशाने लँगना हा ज्यावेळी सिंगापूर विमानतळावरील वॉशरुममध्ये गेला. त्यावेळी त्याला एक वयस्कर व्यक्ती दिसला. जास्त वय दिसणारा व्यक्ती काम करतोय हे पाहून त्याला धक्का बसला. यावेळी त्याने वृद्ध माणसाशी संवाद साधला. यावेळी त्या व्यक्तीने ९१ वर्षांचे असल्याचे सांगितले.
व्यायाम करत नाही, सामान्य आहार घेतो
लँग त्याला पाहून आश्चर्यचकित झाला. लँगने त्यांना त्यांच्या फिटनेसचे रहस्य विचारले. त्यावेळी त्या वृद्धाने सांगितले की, मी सामान्य आहार घेतो आणि कधीही व्यायाम करत नाही. यावर लँग आश्चर्यचकित झाला. त्यावेळी त्याने तुम्ही 'सुपरमॅन' आहात असे सांगितले.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आर. माधवननेही तो व्हिडीओ शेअर केला. नेटकरी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "तो तंदुरुस्त आहे कारण तो नेहमीच सक्रिय लोकांभोवती असतो. व्यायाम महत्त्वाचा नाही, तर आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. तो त्याचे काम आनंदाने करतो." दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, "आज इंटरनेटवर मी पाहिलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे.