फक्त मालकाच्या आवाजाने स्टार्ट होते 'ही' बाईक; बाईकवरील ATM सुद्धा आवाजानेच होतं ऑपरेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 15:07 IST2019-10-12T14:55:25+5:302019-10-12T15:07:10+5:30
कधी तुम्ही अशी बाईक पाहिली का, जी तुमचा आवाज ऐकून स्टार्ट होते किंवा गरज पडेल तेव्हा तुम्हाला पैसे देईल, तुम्ही कंटाळले असाल तर गाणी ऐकवेल आणि गरमी होत असेल तर थंडी हवा देईल?

फक्त मालकाच्या आवाजाने स्टार्ट होते 'ही' बाईक; बाईकवरील ATM सुद्धा आवाजानेच होतं ऑपरेट!
कधी तुम्ही अशी बाईक पाहिली का, जी तुमचा आवाज ऐकून स्टार्ट होते किंवा गरज पडेल तेव्हा तुम्हाला पैसे देईल, तुम्ही कंटाळले असाल तर गाणी ऐकवेल आणि गरमी होत असेल तर थंडी हवा देईल? नाही ना? पण अशी एक बाईक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही अनोखी बाईक बरेलीच्या एका ७० वर्षीय व्यक्तीने तयार केली आहे. या व्यक्तीचं नाव आहे मोहम्मद सईद.
मोहम्मद सईद यांचा सुरमा विकण्याचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये फिरून ते सुरमा विकतात. त्यांनी या बाईकचं नाव 'टार्जन' ठेवलं आहे. या बाईकवर एक मिनी एटीएम, फॅन, म्युझिक सिस्टीम आणि व्हॉईस कमांड सिस्टीम लावण्यात आली आहे. आणि ही बाईक सईद यांच्या इशाऱ्यावर काम करते.
त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, त्यांच्या आवाजाने मिनी एटीएममधून नाणी बाहेर येऊ लागतात. नंतर कमांड दिल्यावर बाईक स्टार्ट होते. तसेच त्यांच्या आवाजानेच बाईकमधील म्युझिक सिस्टीम सुरू होते, तसाच फॅनही सरू होतो.
मोहम्मद सईद यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी आणि आपल्या आवडीसाठी त्यांनी ही बाईक सुरू केली आहे. ते बाईकने जेव्हा दूरदूर जातात, तेव्हा लोक बाईक बघण्यासाठी लोक गर्दी करतात. याने बाईकही बघितली जाते आणि सुरमाही विकला जातो.