एकच बाईकवर 7 लोक, दोन कुत्री, एक बकरी अन् कोंबडा; VIDEO पाहून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:31 IST2023-10-10T14:30:55+5:302023-10-10T14:31:45+5:30
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एकच बाईकवर 7 लोक, दोन कुत्री, एक बकरी अन् कोंबडा; VIDEO पाहून चक्रावून जाल...
Viral Video: एका बाईकवर किती लोक बसू शकतात? जास्तीत जास्त तीन. अनेक शहरांमध्ये तीन किंवा तीनपेक्षा जास्त लोक बाईकवर बसल्यावर पोलिस चालान लावतात. पण, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका बाईकवर एक-दोन-तीन नव्हे, तर चक्क 7 लोक बसलेले दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये संपूर्ण कुटुंब एकाच बाईकवर बसून जात असल्याचे दिसत आहे. बाईकवर एका कुटुंबातील सात लोकच नाही, तर जनावरंही ठेवण्यात आली आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईक चालवत असल्याचे दिसत आहे. दोन मुले पुढे पेट्रोल टाकीवर बसली आहेत. त्या व्यक्तीच्या मागे, पत्नी आणि तिच्या मागे तीन मुलं बसलेली दिसत आहेत.
या सात लोकांसोबत भलं मोठं सामान आणि या सामानासोबत दोन कुत्री, एक बकरी आणि एक कोंबडीही दुचाकीवर बसवली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तुम्हीही व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल. इंस्टाग्रामवर purvanchal51 नावाच्या अकाऊंटवरून क्लिप शेअर करण्यात आली आहे.