बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:00 IST2025-11-12T16:56:53+5:302025-11-12T17:00:05+5:30
अनेकांनी ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. “ही हसण्यासारखी गोष्ट नाही, तर महिलांच्या दयनीय परिस्थितीचे हे प्रतिबिंब आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
सोशल मीडियावर आफ्रिकेतील एक युवक आणि त्याच्या बायकांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हडिओवर सोशल मीडिया युजर्समध्ये जोरदार चर्चाही सुरू आहे. संबंधित युवकाला सहा बायका आहेत आणि त्या सर्वच्या सर्व सध्या गर्भवती अथवा प्रेग्नन्ट असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये गर्भवती सर्व महिलाही स्पष्टपणे दिसत आहेत.
माद्यमांतील वृत्तांनुसार, या व्यक्तीची तुलना केनियाचे प्रसिद्ध ‘बहुपत्नी राजे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकुकु डेंजर यांच्याशी केली जात आहे. सहा पत्नी एकाच वेळी गर्भवती असल्याने, ही व्यक्ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. महत्वाचे म्हणजे, त्याच्या घरात एकाचवेळी एवढ्या महिला गर्भवती असल्याने, त्यांचे घर अक्षरशः “मॅटरनिटी वॉर्ड”सारखे दिसत असल्याचे, परिसरातील लोक सांगत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सकडूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने गंमतीने म्हटले आहे की, “हा माणूस नक्कीच करोडपती असणार!” तर काहींनी त्याला थांबण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय, अनेकांनी ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. “ही हसण्यासारखी गोष्ट नाही, तर महिलांच्या दयनीय परिस्थितीचे हे प्रतिबिंब आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे की, “हे विनोदी नाही, तर इंस्टाग्रामवरील सर्वात भयावह दृश्य आहे. त्या पुरुषाचे वय बघा आणि नंतर या बायकांचे. अतिशय दुर्दैवी.”